Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Bull : द रिअल बुल राकेश झुनझुनवाला!

Market Bull Rakesh Jhunjhunwala

Market Bull – Rakesh Jhunjhunwala : ‘द रिअल बुल-राकेश झुनझुनवाला’ हे एक भारतीय अब्जाधीश व्यावसायिक, चार्टर्ड अकाउंटंट, स्टॉक ट्रेडर आणि इन्वेस्टर होते. एका सामान्य घरात जन्मलेल्या झुनझुनवाला यांचा हा प्रवास खडतर तर होताच; पण तो तितकाच प्रेरणादायी देखील आहे.

आजच्या ‘मार्केट बुल्स’ या सेगमेंटमध्ये आपण एका रिअल बुलचे आयुष्य पाहणार आहोत. फक्त 37 वर्षांच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये 5 हजार रुपयांपासून ते 5 बिलियन डॉलर्सचा हा प्रवास ज्या व्यक्तीने पूर्ण करून शेअर मार्केटच्या इतिहासात आपले मानाचे स्थान बनवले, असे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhujjhunwala) हे केवळ भारतीय शेअर मार्केटचेच नव्हे; तर संपूर्ण भारताचा अभिमान होते. ‘द रिअल बुल-राकेश झुनझुनवाला’ हे एक भारतीय अब्जाधीश व्यावसायिक, चार्टर्ड अकाउंटंट, स्टॉक ट्रेडर आणि इन्वेस्टर होते. एका सामान्य घरात जन्मलेल्या झुनझुनवाला यांचा हा प्रवास खडतर तर होताच; पण तो तितकाच प्रेरणादायी देखील आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे; द रिअल बुल राकेश झुनझुनवाला यांची गोष्ट.

झुनझुनवाला याचे शेअर मार्केटआधीचे आयुष्य!

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 मध्ये मुंबईतील एका मारवाडी परिवारात झाला. त्यांचे वडील राधेश्याम झुनझुनवाला हे इनकम टॅक्स कमिशनर होते. त्यांचे वडील आणि त्यांचे मित्र नेहमी शेअर मार्केटच्या गप्पा करत असत. या गप्पांमुळेच राकेश यांचा शेअर मार्केटमधील इंटरेस्ट वाढत गेला. त्यांनी आपले ग्रॅज्युएशन सिडनेहॅम कॉलेजमधून पूर्ण केले. वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी चार्टेड अकाउंटंटची परीक्षा पास केली. कॉलेजमध्ये शिक्षण सुरू असतानाच त्यांनी शेअमार्केटमध्ये पदार्पण केले. त्यांच्या वडिलांनी त्यांना फक्त मार्गदर्शन केले. त्यांना कुठलीही आर्थिक मदत केली. तसेच इतर कोणाकडून आर्थिक मदत न घेण्याची अट देखील घातली होती. त्यांनी स्वतःकडील सेविंग्स आणि वडिलांचे मार्गदर्शन याच्या बळावर शेअर मार्केटमध्ये पदार्पण केले.

शेअर मार्केटमध्ये दमदार एन्ट्री!

शिक्षण सुरु असतानाच  1985 मध्ये त्यांनी शेअर मार्केटमध्ये इंट्री करत 5 हजार रुपयांपासून ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली होती. त्याच 5 हजारांचे झुनझुनवाला यांनी 5 बिलियन डॉलर्स केले. राकेश झुनझुनवला यांना त्यांचे वडील नेहमी न्यूजपपेर वाचायला सांगत. त्यानुसार ते न्यूजपेपरमधील शेअर्सच्या बातम्या, किमती जाणून घेण्यासाठी तासन् तास घालवत असत. त्यांना वडिलांकडून मार्गदर्शन मिळत होते. पण पैसे मिळत नव्हते. त्यामुळे त्यांना रिस्क घेणे गरजेचे होते आणि ती घेण्यापासून ते कधीच घाबरले नाहीच. अशीच एकदा त्यांनी मोठी रिस्क घेतली. त्यांनी त्यांच्या भावाच्या एका क्लायंटना पैसे गुंतवण्यासाठी तयार केले व त्यांना बँकेच्या फिक्स्ड डिपॉसिटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवून देण्याची हमी दिली होती.

राकेश झुनझुनवाला आणि मार्केट!

राकेश झुनझुनवाला यांचे पाहिले मोठे प्रॉफिट टाटा टी (Tata Tea) या शेअरने त्यांना मिळवून दिले होते. 1986 मध्ये त्यांनी टाटा टी चे 5 हजार शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले व तीन महिन्यांनंतर 43 रुपयांचे तेच शेअर त्यांनी 143 रुपयांना विकले. त्यांनी या ट्रेडमधून जवळजवळ तीन पट प्रॉफिट मिळवला. त्यांनी मार्केटमध्ये पदार्पण केल्यानंतर काही वर्षातच 20  ते 25 लाखांचा प्रॉफिट मिळवला.

2002-03 मध्ये त्यांनी त्यांची फेवरेट टायटन कंपनी लिमिटेड (Titan Ltd) चे शेअर्स विकत घेतले. खरेदी करताना या शेअर्सची किंमत 3 रुपये होती. आज तोच  शेअर 2,140 रुपयांना आहे. यावरून झुनझुनवाला यांचा दृष्टिकोन दिसून येतो. टायटनचे त्यांच्याकडे  4.4 कोटी शेअर्स होते. यावरून त्यांचे टायटन कंपनीवर किती प्रेम होते. हे दिसून येते. 2022 मध्ये ते टायटनचे 5.10 टक्के मालक होते.

2006 मध्ये त्यांनी लुपिन (lupin) या फार्मास्युटिकल कंपनीचे शेअर्स 250 रुपयांनी विकत घेतले होते. आज या शेअर्सची किंमत जवळ जवळ 700 रुपये आहे. 

त्यांची पुढील मोठी गुंतवणूक Sesa Goa ही होती, जी त्यांनी सुरुवातीला 28 ला विकत घेतली आणि नंतर त्याची गुंतवणूक 35 मध्ये वाढवली. लवकरच हा स्टॉक 65 वर गेला व त्यांनी यातून चांगला फायदा मिळवला.

त्यांच्या इतर प्रमुख होल्डिंगमध्ये त्यांनी फुटवेअर ब्रँड मेट्रो मध्ये 2255 कोटी रुपये, क्रिसिलमध्ये 1285 कोटी रुपये आणि फोर्टिसमध्ये 853 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांचे अनेक ट्रेड्स हे एक्सट्रा-ऑर्डीनरी होते; त्यामुळे त्यांना एक्सट्रा-ऑर्डीनरी फायदा ही झाला. 

राकेश झुनझुनवाला हे शेअर मार्केटचे रिअल बुल जरी असले तरी ते केवळ मार्केटपर्यंतच मर्यादित नव्हते. ते प्राईम फोकस लिमिटेड, जिओजित बीएनपी परिबा वित्तीय सेवा, प्राज इंडस्ट्रीज, कॉन्कॉर्ड बायोटेक इत्यादी मोठ्या कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे सदस्य ही होते. तसेच त्यांना सिनेमामध्ये ही इंटरेस्ट होता. त्यांनी ‘इंग्लिश-विंग्लिश’, ‘शमिताभ’, ‘की अॅण्ड का’ या चित्रपटांची निर्मिती केली. हंगामा डिजिटल मिडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे ते अध्यक्ष होते.

इन्व्हेस्टमेंट आणि पोर्टफोलिओ

राकेश झुनझुनवाला हे RARE Enterprises नावाची खाजगी मालकीची स्टॉक ट्रेडिंग फर्म चालवत होते. त्यांनी टायटन, क्रिसिल, अरबिंदो फार्मा, प्राज इंडस्ट्रीज, एनसीसी, अॅपटेक लिमिटेड, आयन एक्सचेंज, एमसीएक्स, फोर्टिस हेल्थकेअर, लुपिन, व्हीआयपी इंडस्ट्रीज, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, रॅलिस इंडिया, ज्युबिलंट लाइफ सायन्सेस इत्यादीं स्टॉक्सचा समावेश त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये केला होता.

जुलै 2021 मध्ये, त्यांनी Akasa Air या भारतातील एअरलाईन कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. या एअरलाईन कंपनीत त्यांनी 40 टक्के स्टेकसाठी 400 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली होती. सप्टेंबर 2022 पर्यंत, या एअरलाईन्सकडे 7 विमाने असून ती 6 शहरांमध्ये उड्डाण करतात. झुनझुनवाला यांनी या एअरलाईन्समधील आपला हिस्सा 46 टक्क्यांपर्यंत वाढवला होता आणि कंपनीतील ते सर्वात मोठे  भागधारक होते.

“तू डर मत” झुनझुनवाला यांचा मार्केट मंत्रा!

झुनझुनवाला यांनी कधीच स्वतःला कोणत्याही ट्रेडर प्रकारात मोजले नाही. ते स्वतःला लॉन्ग व शॉर्ट टर्म असे दोन्ही इन्वेस्टर मानत असत. ते म्हणत, “उत्साही गुंतवणूकदार नेहमी स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवतात. कोणतेही काम उत्कटतेने केले तर त्यात कधीही अपयश येत नाही” (Passionate investors always make money in stock markets. You will never fail in any work if you do it with passion). “तू डर मत” हाच त्यांचा मार्केट मंत्रा होता. जो ते नेहमी लक्षात ठेवत आणि न घाबरता ट्रेड करत. झुनझुनवाला हे जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे फंडे बरेच ट्रेडर फॉलो करतात. त्यांच्या 5 हजार ते 5 बिलिअन डॉलर्सच्या प्रवासाने अनेकांना मार्केटमध्ये उतरण्यासाठी प्रेरणा मिळाली व इथून पुढेही मिळत राहील हे नक्की! 

image source : https://www.fortuneindia.com