Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mankind IPO : ग्लॅण्ड फार्मानंतरचा सर्वात मोठा आयपीओ उभारण्यास सज्ज मॅनकाइंड!

Mankind IPO : ग्लॅण्ड फार्मानंतरचा सर्वात मोठा आयपीओ उभारण्यास सज्ज मॅनकाइंड!

Mankind IPO : औषधनिर्माता कंपनी असलेली मॅनकाइंड आपल्या आयपीओसाठी सज्ज झाली आहे. मॅनफोर्स कंडोम निर्माता कंपनी मॅनकाइंड या महिन्यात जवळपास 4,700 कोटी रुपयांचा आयपीओ (Initial public offering) लॉन्च करणार आहे. कंपनीची ही योजना यशस्वी झाली तर हा या विभागातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आयपीओ असेल.

मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) देशांतर्गत बाजारपेठेचा विचार केल्यास विक्रीच्या बाबतीत भारतातली चौथी सर्वात मोठी कंपनी आहे. तर आर्थिक वर्ष 2022च्या विक्रीच्या प्रमाणात दुसरी सर्वात मोठी औषध कंपनी ठरली आहे. या महिन्याच्या शेवटी सुमारे 4,200 कोटी ते 4,700 कोटी रुपये उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अपेक्षित असलेल्या आयपीओसाठी सज्ज झालीय. या एकूण विषयाची माहिती असलेल्या उद्योग सूत्रांकडून याची माहिती मिळत आहे. मनीकंट्रोलनं यासंबंधीचं वृ्त्त दिलंय. या आयपीओची योजना यशस्वी झाली तर हा क्रमांक दोनचा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. नोव्हेंबर 2020मध्ये ग्लॅण्ड फार्मानं (Gland Pharma) एक आयपीओ लॉन्च केला होता. त्याची किंमत 6480 कोटी रुपये होती. त्यानंतर या विभागातला हा दुसरा सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो.

एप्रिलमध्येच आणणार आयपीओ

मॅनकाइंड ही दिल्लीस्थित एक औषधनिर्माता कंपनी आहे. मॅनकाइंड फार्मा ही प्रायव्हेट इक्विटी फर्म क्रीस कॅपिटल आणि कॅपिटल इंटरनॅशनल यांच्या भागीदारीसह सुरू असलेली कंपनी आहे. या कंपनीमार्फत टॉप-सेलिंग कंडोम ब्रँड मॅनफोर्स कंडोम, प्रेगा न्यूज आणि इमर्जन्सी गर्भनिरोधक ब्रँड अनवॉन्टेड -72 असे प्रॉडक्ट्स उपलब्ध केले जातात. या आयपीओसंदर्भात कंपनीनं मागच्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये (2022) सेबीकडे डीआरएचपी (Draft red herring prospectus) दाखल केला होता. तर मागच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यातच कंपनीनं आगामी योजनांसंदर्भात एक अहवाल दिला होता. त्यात ही बाबही समाविष्ट केली होती. एप्रिल 2023च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये कंपनी आपला आयपीओ आणण्याचं नियोजन करत आहे.

बाजारपेठेत मजबूत स्थान

कंपनीशी संबंधित एकानं दिलेल्या माहितीनुसार, मॅनकाइंड हा एक चांगला व्यवसाय असलेला उच्च गुणवत्तेचा, वेगानं वाढणारा, स्केल-अप खेळाडू आहे.  बाजारपेठेत एक मजबूत स्थान कंपनीनं मिळवलं असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयपीओ हा शुद्ध ओएफएस (Offer for Sale) किंवा 10 टक्के भागभांडवल विक्रीसाठी ऑफर करण्याचा हेतू असणार आहे. विक्री करणार्‍या भागधारकांमध्ये क्रीस कॅपिटल, कॅपिटल इंटरनॅशनल, प्रवर्तक कुटुंब आणि इतरांचा समावेश असणार आहे. फर्मचं अंतिम मूल्यांकन पुढच्या काही दिवसांत गोठवलं जाणार आहे. सध्याच्या बाजारातल्या परिस्थितीच्या आधारावर आधीच्या अंदाजांच्या तुलनेत हे मूल्यांकन समायोजित केलं गेलं आहे, अशी माहिती देण्यात आली. ही सर्व माहिती संबंधित व्यक्तीनं नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली आहे.

हिस्सा आणि विस्तार

कॅपिटल इंटरनॅशनलनं क्रिस कॅपिटलकडून 2015मध्ये मॅनकाइंड फार्मामधील 11 टक्के हिस्सा 200 दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी केला. एप्रिल 2018मध्ये, जीआयसी (General Insurance Corporation) आणि सीपीपीआयबी (Canada Pension Plan Investment Board) यांचा समावेश असलेल्या क्रीस कॅपिटलच्या नेतृत्वाखालच्या कन्सोर्टियमनं पुन्हा एकदा सुमारे 350 दशलक्ष डॉलरमध्ये 10 टक्के हिस्सा खरेदी केला. भारत आणि नेपाळमध्ये प्रमाणित असलेल्या पनेशिया बायोटेकचे (Panacea Biotec) 1, 872 कोटींमध्ये फॉर्म्युलेशन ब्रँडही विकत घेतले.

मॅनकाइंडनं बनवलेत 36 ब्रँड

मॅनकाइंड फार्मा या कंपनीची स्थापना रमेश जुनेजा यांनी केली. 1995मध्ये पूर्णपणे एकात्मिक अशी ही फार्मास्युटिकल कंपनी बनली. फार्मास्युटिकल व्यवसायात मॅनकाइंड फार्मानं 36 ब्रँड तयार केले आहेत. भारतीय फार्मास्युटिकल मार्केटमधल्या वैद्यकीय प्रतिनिधींच्या सर्वात मोठ्या वितरण नेटवर्कपैकी ही एक कंपनी आहे. 2022 या आर्थिक वर्षात देशातल्या 80 टक्क्यांहून अधिक डॉक्टरांनी त्यांचं फॉर्म्युलेशन लिहून दिलंय. (स्रोत : IQVIA) त्यामुळे भारतात औषधाचा एक उत्तम ब्रँड म्हणून प्रस्थापित होण्यास कंपनीला मदत झाली.  फर्मला त्याचे ब्रँड भारतात स्थापित करण्यात मदत केली आहे.