Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पैसे कमावताय पण गुंतवणूक कशी करायची? जाणून घ्या 5 बेस्ट पर्याय व फायदे!

5 Best Investment Options

पैसे गुंतवण्याचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. पण आपल्या मेहनतीचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर आज आपण गुंतवणुकीचे 5 बेस्ट पर्याय आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

अनेक लोक पैसे मुबलक प्रमाणात कमावत असतात, पण त्यांना अजूनही गुंतवणूक कशी आणि कुठे करावी? याबाबत पुरेशी माहिती नसते किंवा त्यांना माहिती नसते. त्यामुळे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधणं महत्त्वाचे ठरते. याच पार्श्वभूमीवर आम्ही तुमच्यासाठी 5 सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आणि त्यातून मिळणारे फायदे तुम्हाला सांगणार आहोत.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan)

म्युच्युअल फंड पैसे गुंतवण्यासाठी एक चांगला मार्ग असू शकतो. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा आपल्या कुवती नुसार त्यापद्धतीने यात पैसे टाकू शकता तसेच आपली मिळकत वाढल्यास आपण एसआयपी मधील गुंतवणूक वाढवू शकतो. आयुष्यातील एका टप्प्यावर यातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. 

एसआयपीचे फायदे 

• आपणास बचतीची सवय लागते
• सोयीस्कर आहेत 
• कमी जोखीमीची गुंतवणूक 
• कंपाउंडिंगची ताकद

इक्विटी म्युच्युअल फंड योजना (Equity Mutual Fund)

इक्विटी म्युच्युअल फंड प्रामुख्याने कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंडाच्या नियमांनुसार, मालमत्तेपैकी किमान ६५ टक्के इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक असते. गुंतवणुकदारांचा पैसा कोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लावायचा हे त्या फंडाचा मॅनेजर ठरवतो. पण  हा सर्वात जास्त जोखिम असलेला फंड आहे परंतू यातून मिळणारा रिटर्न देखील खूप जास्त असतो.

फायदे

भरपूर पर्याय उपलब्ध 
सर्वात जास्त परतावा मिळू शकतो

मुदत ठेव (Fixed Deposit)

बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा एक लोकप्रिय पर्याय आहे. यात खात्रीशीर परतावा मिळेलच याची गॅरेंटी असते आणि सुरक्षितता यामुळे गुंतवणुकीसाठी लोकांचा कलमुदत ठेवीवर जास्त आहे. तसेच ठेवीदाराचा मुद्दल आणि व्याज दोन्ही रकमेसाठी कमाल १ लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवला जातो. गरजेनुसार, मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक किंवा संचयी व्याज पर्याय निवडू शकतात. 

यात प्रत्येक बँक वेगवेगळे व्याज दर देत तर असते सेबी चे ५.४०% मुदत ठेव वर व्याज दर देते आणि महागाई नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँक पुन्हा धोरणात्मक दर वाढवेल. या वर्षाच्या अखेरीस रेपो दर ६ टक्क्यांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.

फायदे 

सुरक्षितता 
निश्चित परतावा 
लवचिकता
विमा 
व्याज पर्याय

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(Public Provident Fund) 

पीपीएफ किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना ही सरकारद्वारे ऑफर केलेली एक अतिशय लोकप्रिय सेवानिवृत्ती योजना आहे.गुंतवणुकीचा विचार केल्यास दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला खूप पुढे नेईल. त्यासाठी पीपीएफ हा योग्य पर्याय आहे उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या PPF गुंतवणुकीसाठी रु. १,००,००० ची वार्षिक पेमेंट १५ वर्षांसाठी ७.१% दराने केल्यास, १५ वर्षांच्या शेवटी तुमची मॅच्युरिटी रक्कम रु. ३१,१७,२७६ इतकी मिळू शकते.

सोन्यात गुंतवणूक (Gold)

भारतात सोने घेणं हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जात आणि बरेच कुटूंब यात गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात तसेच दागिन्यांच्या रूपात सोन्याची मालकी असण्यामागे सुरक्षितता आणि उच्च किंमत यासारखी याला जोड मिळते आणि अधिक किफायतशीर रीतीने कागदी सोन्याच्या मालकीचा पर्यायी मार्ग म्हणजे गोल्ड ईटीएफ होय. या द्वारे जेथे खरेदी आणि विक्री स्टॉक एक्स्चेंज (NSE किंवा BSE) वर सोने ही अंतर्निहित मालमत्ता म्हणून होते.

अप्रत्यक्ष सोने: गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड म्युच्युअल फंड 

तुम्ही गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करता, तेव्हा ते प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करण्यासारखेच असते, गोल्ड ईटीएफ भौतिक सोन्याप्रमाणेच सुविधा देते आणि तुम्ही खात्री बाळगू शकता की तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे. गोल्ड ईटीएफ म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंड गुंतवणूकदारांना सोन्यात छोटी गुंतवणूक करण्याची संधी देतात. ते विकल्यावर तुम्हाला सोने मिळत नाही तर त्यावेळच्या बाजार मूल्याएवढी रक्कम मिळते.

फायदे 

सुरक्षितता
उत्तम परतावा 
सोने खरेदीचे समाधान

आवर्ती ठेव (Recurring Deposit) 

तुम्ही एसआयपी सारखे आरडी देखील सुरू करू शकता. आपण कमी मुदतीच्या ठेवीसाठी पैसे बचत करू शकता. दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून एक निश्चित रक्कम कापून तुमच्या आरडी खात्यात जमा केली जाते. यातून आपण गुंतवणूक योग्य वेळी योग्य ठिकाणी केल्यास आपण आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास भविष्यातील अनेक स्वप्न पूर्ण करण्यास सक्षम होऊ शकतो.

फायदे 

उच्च-व्याज दर
किमान रु पासून सुरुवात 
अल्पकालीन उद्दिष्टांसाठी सर्वोत्तम