Who developed BharOS: अँड्रॉइड आणि अॅपल तगडी स्पर्धा देण्यासाठी भारतातील आयआयटी मद्रासच्या फर्मने एक ऑपरेटिंग सिस्टिम (OS) तयार केली आहे. ज्याचे नाव BharOs असे आहे. नुकतीच या सिस्टमची यशस्वी चाचणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Central Minister Ashwini Vaishnav) व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Central Education Minister Dharmendra Pradhan) यांच्या हस्ते करण्यात आली आहे. या BharOs बाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.
BharOs म्हणजे काय
BharOs या ऑपरेटिंग सिस्टिमला ‘भारोस’ असेदेखील म्हणतात. या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या (IIT Madras) इनक्यूबेटेड फर्मने तयार केले आहे. याची खासियत म्हणजे यामध्ये हाय-टेक सेफ्टी व प्रायव्हसी फीचर्स असणार आहे. या सिस्टममध्ये युजर्सला आपल्या गरजेनुसार अॅप निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असणार आहे. विशेष म्हणजे युजर्सला माहित नसलेले व सुरक्षितेचा विचार म्हणून सुरिक्षत नसलेले अॅप मोबाईलमध्ये अपलोड करण्याची सक्ती केली जाणार नाही. भारतात या सिस्टमचा उपयोग 100 कोटी युजर्सला होणार असल्याचे सांगितले जात आहे.
BharOS ची सुरक्षा
BharOS हे एक विश्वासनीय मोबाईल आॅपरेटिंग सिस्टम आहे. जी युजर्सला संस्था-विशिष्ट खाजगी अॅप स्टोअर सेवा (PASS)मधील सुरक्षित अॅप्सना युजर्सच्या मोबाईलमध्ये स्थान देणार आहे. त्यामुळे युजर्सने डाउनलोड केलेले कोणतेही अॅप त्यांच्या मोबाईलमध्ये सुरक्षित असणार आहे.