Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NFO Investment: महिन्द्रा म्युच्युअल फंडकडून बिझनेस सायकल फंड लॉन्च, 4 सप्टेंबरपर्यंत करता येणार गुंतवणूक

Mahindra New NFO Launched

NFO Investment: महिन्द्रा अ‍ॅण्ड महिन्द्रा ग्रुपमधील महिन्द्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंडने बिझनेस सायकल फंड लॉन्च केला. हा फंड 21 ऑगस्टपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला असून 4 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करता येणार आहे.

NFO Investment: महिन्द्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंड हाऊसने Mahindra Manulife Business Cycle Fund लॉन्च केला आहे. हा एक ओफन एंडेट इक्विटी फंड आहे. 21 ऑगस्टपासून महिन्द्राचा एनएफओ (New Fund Offer-NFO) ओपन झाला असून, तो 4 सप्टेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

महिन्द्रा मॅन्युलाईफ बिझनेस सायकल फंड 4 सप्टेंबरला बंद झाल्यानंतर तो 13 सप्टेंबरपासून नियमितपणे खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या फंडमध्ये जमा होणारा निधी इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित विविध सेक्टरमध्ये गुंतवला जाणार आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा फंड फायद्याचा ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बिझनेस सायकल फंड म्हणजे काय?

बिझनेस सायकल फंड हे अशा शेअर्स आणि सेक्टरवर आपले लक्ष्य केंद्रीत करतात. ज्यातून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. एका ठराविक कालावधीत इक्विटी क्षेत्रातील महत्त्वाची कामगिरी पार पाडण्यासाठी बिझनेस सायकलचा उपयोग होते. बिझनेस सायकलचे वेगवेगळे टप्पे असतात आणि या प्रत्येक टप्प्याचा एक वेगळा उद्देश असतो. या उद्देशानुसारच बिझनेस सायकल फंड काम करतात.

महिन्द्रा मॅन्युलाईफ बिझनेस सायकलने आणलेल्या फंडद्वारे इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. या फंडद्वारे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. बिझनेस सायकल फंडाच्या वैशिष्ट्यानुसार अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या टप्प्यांवर महिन्द्राचा हा विशेष फंड लक्ष्य केंद्रीत करणार आहे. या फंडचे मॅनेजर कृष्णा संघवी, रणजिथ शिवराम राधाकृष्णन असणार असणार आहेत.

किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक

महिन्द्रा मॅन्युलाईफ बिझनेस सायकल फंडमध्ये किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. तसेच या फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी 3 महिन्यांपूर्वी पैसे काढून घेतले तर त्यावर 1 टक्का एक्झिट लोड भरावा लागणार.