Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mahindra EV plant: पुण्यात महिंद्राचा EV प्रकल्प, दहा हजार कोटींची करणार गुंतवणूक

Mahindra EV plant pune

Image Source : www.motorbeam.com

पुण्यातील महिंद्राची गुंतवणूक ही जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आखलेल्या रणनीतीचा भाग आहे. महिंद्रा कंपनी स्वत: इव्ही कार निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करत आहे. तसेच काही मॉडेल वाहने कंपनीने ब्रिटनमध्ये एका कार्यक्रमात सादर देखील केले आहेत.

ऑटो क्लस्टर असलेल्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिंद्रा कंपनी पुण्यामध्ये १० हजार कोटींचा इलेक्ट्रिक वाहननिर्मिती प्रकल्प उभारणार आहे. पुढील सात ते आठ वर्षात ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या औद्योगिक विभागाकडून या गुंतवणूकीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती उद्योगांसाठी राज्य सरकारकडून योजना राबविण्यात येते. त्याअंतर्गत हा प्रकल्प उभा राहणार आहे. 

चाकण येथे प्रकल्प उभारणार( Plant will be at Chakan Area)


पुण्यामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठीच्या सुविधा या फंडातून करण्यात येणार आहेत. INGLO EV प्लॅटफॉर्मवर आधारित गाड्या या प्रकल्पामध्ये तयार करण्यात येणार आहेत. तसेच XUV ब्रँडनेम खाली त्या बाजारात येणार आहेत. पुण्यातील चाकण येथे हा प्रकल्प उभा राहणार आहे. महिंद्रा कंपनीचा चाकण येथे आधीपासूनच वाहन निर्मिती प्रकल्प आहे. प्रगतीशील धोरणे आणि व्यवसाय करण्यात सुलभता यास राज्य सरकारचे प्राधान्य आहे. महिंद्राच्या गुंतवणूकीमुळे महाराष्ट्र राज्य भारतामध्ये इव्हीचे हब बनेल. या प्रकल्पामुळे आणखी परकीय थेट गुंतवणूक राज्यात येईल, महिंद्राचे ऑटो आणि फार्म विभागाचे संचालक राजेश जेजुरीकर यांनी म्हटले.   

महिंद्राचे स्वत:चे EV तंत्रज्ञान - (Mahindra's won EV technology)

पुण्यातील महिंद्राची गुंतवणूक ही जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात पुढे जाण्यासाठी केलेल्या रणनीतीचा भाग आहे. महिंद्रा कंपनी स्वत: ची इव्ही कार निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करत आहे. तसेच काही वाहने कंपनीने ब्रिटनमध्ये एका कार्यक्रमात सादर देखील केले होते. इव्ही गाड्या चार्जिंग करण्यासाठीच्या सुविधा आणि वाहन निर्मितीसाठी कंपनी इतर कंपन्यांशीही भागीदारी करत आहे. मागील सत्तर वर्षांपासून महिंद्रा पुण्यात गुंतवणूक करत आहे, असंही जेजुरीकर म्हणाले.  

पाच इव्ही बाजारात येणार (New five EV cars will come in Market)

या वर्षी ऑगस्ट महिन्यात पाच इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणणार असल्याचे कंपनीने जाहीर केले होते. देशात आणि परदेशातही ती लाँच करण्याचे नियोजन महिंद्रा कंपनीने केले आहे. २०२४ ते २०२६ मध्ये यातील चार इव्ही लाँच केल्या जातील. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे.