भारतीय लष्कराकडे अत्याधुनिक एसयुव्ही (SUV) वाहनांचा समावेश आहे. भारतीय लष्कराच्या जवळपास 12 तुकड्यांमध्ये याचा वापर करण्यात येतो. आता लष्कराच्या ताफ्यात आणखी तब्बल 1850 एसयूव्हींचा समावेश होणार आहे. यासाठी लष्कराकडून भारतातील महिंद्रा कंपनीला स्कॉर्पिओच्या क्लासिक मॉडेलची ऑर्डर देण्यात आली आहे. स्कॉर्पिओ क्लासिक (Scorpio Classic) ही स्कॉर्पिओची अद्ययावत आवृत्ती आहे.
1,470 यूनिटची ऑर्डर पूर्ण-
महिंद्रा कंपनीला भारतीय लष्कराकडून जानेवारीमध्ये 1,470 यूनिटची ऑर्डर मिळाली होती. ती पूर्ण करताच आता आणखी 1850 गाड्यांची ही दुसरी ऑर्डर मिळाली आहे. स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 2.2-लिटर डिझेल इंजिन वापरण्यात आले आहे. इंजिनच क्षमता 130 अश्व शक्ती आणि 300 Nm पीक टॉर्क जनरेट करते. Scorpio Classic मध्ये कोणतेही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन नाही.तसेच क्लासिकचे इंजीन हे जुन्या इंजिनच्या तुलनेत हे इंजिन 55 किलोने हलके आहे. कंपनीचा असा विश्वास आहे की या नवीन इंजिनसह, एसयूव्ही पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली बनली आहे.
भारतीय लष्करात असलेली वाहने
भारतीय सैन् दलाकडे टाटा सफारी , टाटा झेनॉन , फोर्स गुरखा आणि मारुती सुझुकी जिप्सी या वाहानांचा समावेश आहे. स्कॉर्पिओ क्लासिकच्या समावेशाने भारतीय लष्कराची क्षमता आणखी वाढेल आहे. तसेच संरक्षण क्षेत्राशी महिंद्राच्या सहयोगाने सशस्त्र दलांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि विश्वासार्ह वाहने प्रदा केली आहेत. त्यामुळे महिद्राला लष्कराकडून दुसरी ऑर्डर मिळाल्याचे म्हटले जात आहे.