Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Scheme : पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनांमध्ये एप्रिलपासून बदल; महिलांसाठी नवीन गुंतवणूक योजना

Changes in post office scheme

Post Scheme: केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये दोन सर्वात लोकप्रिय पोस्ट ऑफिस योजनांमध्ये काही बदल करण्यात आले आहे आणि महिला गुंतवणूकदारांसाठी एका नवीन योजनेची घोषणा देखील केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये पोस्टाशी संबधित या योजनांबाबत घोषणा केली होती.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)आणि पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS) या बचत योजनांमध्ये 1 एप्रिल 2023 पासून मोठा बदल होणार आहे. सरकारने व्याजदर व गुंतवणूक कालावधी संदर्भात केलेले बदल जाणून घेऊया.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील (SCSS)

अर्थसंकल्प 2023 मध्ये, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील (SCSS) गुंतवणूक मर्यादा 15 लाखांवरून 30 लाख रुपये करण्यात आली आहे. केंद्र सरकारची ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची (SCSS) स्थापना 2004 मध्ये ज्येष्ठांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या वर्षांसाठी उत्पन्नाचा एक विश्वासार्ह आणि सुरक्षित स्त्रोत देण्याच्या उद्देशाने करण्यात आली. या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी SCSS वर 8% व्याजदर देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत कुठलाही कर बचतीचा लाभ मिळत नाही. 

अर्थसंकल्प 2023 नुसार, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी (POMIS) स्वतंत्र खातेधारक गुंतवणूक मर्यादा 4 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच, संयुक्त खातेधारकांसाठी ही मर्यादा 4 लाखांवरून वाढवून 9 लाख रुपये करण्यात आली आहे. 

मंथली इन्कम स्कीम (POMIS)

मासिक उत्पन्न योजना गुंतवणूकदारांना आता दरमहा व्याज मिळणार आहे . साठीचे व्याजदर सरकार निश्चित करणार आहे.  जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीसाठी व्याजदर 7.1% आहे. एमआयएस खात्यात 5 वर्षांसाठी गुंतवणूक करण्यात येते. तसेच ते 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी बंद असेल दंड म्हणून 1% मुद्दल आकारली जाते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC)

महिला गुंतवणूकदारांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची घोषणा या केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये करण्यात आली. ही अल्प-मुदतीची बचत योजना आहे. यात दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या म्हणण्यानुसार ही बचत योजना महिला वर्गासाठी लाभदायी ठरणार आहे. मार्च 2023 महिला गुंतवणूकदारांना या योजनेतील प्रथम परतावा दिला जाईल. यात दोन वर्षांच्या कालावधीसाठी महिला किंवा मुलींच्या नावावर

एक वेळची नवीन लहान बचत योजना, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, दोन वर्षांच्या कालावधीसाठी मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून दिले जाईल. यामध्ये रु. पर्यंत ठेव सुविधा उपलब्ध केली जाईल. काही प्रमाणात पैसे काढण्याच्या पर्यायासह 7.5 टक्के निश्चित व्याज दराने 2 वर्षांच्या कालावधीसाठी महिला किंवा मुलींच्या नावावर 2 लाख रुपये ठेवल्यास 7.5% व्याजदराने दोन वर्षांनंतर परतावा मिळेल. 

www.moneycontrol.com