Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government Scheme: महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजनेचा लाभ काय आहे ?

Government Scheme

Image Source : www.facebook.com

Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana: अजूनही स्त्रियांचे निरक्षर आणि निर्धन असण्याचे प्रमाण फार मोठे आहे. याची जाणीव प्रामुख्याने ग्रामीण भागात होते. स्त्रियांचा सर्वांगिण विकास व्हावा याउद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वातीने विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना योजना होय. या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ? आणि या योजनेचा लाभ कोणाकोणाला होतो ?

Scheme For Women: महाराष्ट्र सरकारने महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना सुरू करून, महिला विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. या दूरदर्शी योजनेचे उद्दिष्ट महिलांचा विकास करणे, त्यांची कौशल्ये वाढवणे आणि त्यांना सक्षम करणे हे आहे. तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग नोंदवणे, सर्वसमावेशक सहाय्य आणि संसाधने प्रदान करणे हे आहे.

कौशल्य विकास कार्यक्रमांचा लाभ काय?

महासमृद्धी महिला सक्षमीकरण योजना हि योजना महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी, त्यांना स्वावलंबी आणि कौशल्यपूर्ण बनविण्यासाठी राबविण्यात आली आहे. महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजने मध्ये नोंदणी केलेल्या महिलांना विविध क्षेत्राअंतर्गत तसेच उद्योगांसाठी आखण्यात आलेल्या विविध कौशल्य विकास कार्यक्रमांचा लाभ घेता येतो. या योजनेसाठी पात्र महिला ऑनलाइन नोंदणी करु शकतात. आधार कार्ड, रहिवासी दाखला, तसेच नोंदणी करण्यास आवश्यक कागदपत्रे देऊन, या योजनेची नोंदणी बचत गटामार्फत करता येते.

आर्थिक मदत कशी मिळवावी

या योजनेअंतर्गत महिलांच्या मालकीच्या व्यवसायांना किंवा उद्योजकीय उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी कर्ज, अनुदान किंवा सबसिडीच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिल्या जाते. महिला उद्योजक त्यांची उद्दिष्टे,आर्थिक गरजा आणि अपेक्षित परिणाम दर्शविणारा व्यवसाय याबाबत योजना किंवा प्रस्ताव सादर करून आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करू शकतात.

या योजनेची उद्दीष्ट्ये काय

  1. लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील महिलांचे सक्षमीकरण करणे.
  2. महिलांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचे आर्थिक स्वातंत्र्याचा विकास करण्यास मदत करणे.
  3. महिला उद्योजकांसाठी क्रेडिट आणि वित्तीय सेवांमध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी मदत करणे.
  4. उद्योजकता आणि व्यावसायिक गतीविधीमध्ये महिलांच्या सहभागाला आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी.
  5. महिलांच्या मालकीच्या व्यवसायांचा विकास करण्यासाठी आणि बाजारपेठेतील संबंध तसेच समर्थन प्रदान करण्यासाठी.
  6. प्रशिक्षण देऊन आणि संसाधने प्रदान करुन, ग्रामीण भागातील महिलांसाठी कृषी उत्पादकता आणि उत्पन्न वाढविण्यास मदत करणे.
  7. महिलांच्या हक्कांबद्दल जागरुकता वाढवणे आणि महिलांच्या प्रगतीला अडथळा ठरणाऱ्या सामाजिक नियमांना आव्हान देणे.
  8. महिलांना त्यांच्या आकांक्षांचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहन देणारी सर्वसमावेशक आणि सहाय्यक परिसंस्था (Ecosystem) निर्माण करणे.
  9. महिलांना त्यांचे उद्योजकीय कौशल्य वाढवण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम आणि व्यवसाय विकास सेवा प्रदान करणे.
  10. महिलांना उद्योगामध्ये मार्केटींग करता यावी, त्यासाठी नेटवर्क वाढविता यावे, यासाठी मदत करणे.


या योजनेचे संभाव्य फायदे काय?

  1. विविध उद्योगांमध्ये महिलांसाठी कौशल्य विकासाच्या संधी वाढवल्या जात आहे.
  2. व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे महिलां मधील रोजगार क्षमता वाढवणे आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी मदत.
  3. महिलांच्या मालकीच्या व्यवसायांना समर्थन देण्यासाठी अनुदानित कर्ज आणि आर्थिक सहाय्य  उपलब्ध करुन दिल्या जाते.
  4. महिला उद्योजकांसाठी क्रेडिट आणि वित्तीय सेवांमध्ये मदत होते.
  5. महिलांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बाजारपेठेतील संबंध आणि उद्योजकीय समर्थन मिळवून देण्यास.
  6. प्रशिक्षण आणि संसाधनांची सोय उपलब्ध करुन देत, महिला शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पादकता आणि उत्पन्न वाढवणे.
  7. आधुनिक शेती तंत्र आणि उपकरणे उपलब्ध करून ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण होते.
  8. लिंग समानतेला प्रोत्साहन देणे आणि सामाजिक निकषांना आव्हान देणारे जनजागृती अभियान आणि कार्यशाळा घेतल्या जाते.
  9. महिलांचे उद्योजकीय कौशल्य वाढवण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम आणि व्यवसाय विकास कार्यक्रम घेतल्या जाते.
  10. महिलांना त्यांच्या आकांक्षांचा पाठपुरावा करण्यास आणि अडथळे दूर करण्यासाठी प्रोत्साहन देणारी एक आश्वासक परिसंस्थेची निर्मिती केल्या जाते.