प्राप्तीकरविभागाची करचुकवेगिरी करणाऱ्यांवर करडी नजर आहे. कर चुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात आयकर विभाग वेळोवेळी कारवाई करत असतो. नियमित कर भरणे हे खरे तर सजग नागरिकाचे कर्तव्य आहे आणि यासाठी प्राप्तीकर विभाग नागरिकांना वेळोवेळी सूचना देत असतो.
ऑगस्ट महिन्यात आयकर विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार करप्राप्त उत्पन्नावर कर भरणा करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली असून त्यातून देशाचा महसूल देखील वाढला आहे. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 (Global Fintech Fest 2023) मध्ये बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर समाधान व्यक्त केले आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की प्रत्येक कर स्लॅबमध्ये कर भरणामध्ये किमान तीन पट वाढ दिसून आली आहे. कर भरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत होत असलेली वाढ समाधानकारक आहे असेही त्या म्हणाल्या.
Smt @nsitharaman inaugurated an exhibition at the Global Fintech Fest 2023 in Mumbai, Maharashtra.
— Nirmala Sitharaman Office (@nsitharamanoffc) September 5, 2023
The Finance Minister also visited the stalls put up by the Reserve Bank of India (@RBI) and National Payments Corporation of India (@NPCI_NPCI). pic.twitter.com/STjtHx4hmj
महाराष्ट्र आघाडीवर
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार कर भरणा करण्यात सर्वात आघाडीवर महाराष्ट्र राज्य आहे. एवढेच नाही तर जीएसटी भरण्यातही महाराष्ट्राने आघाडी गाठली आहे. आयकर भरण्यात महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात आणि राजस्थान या राज्यांचा नंबर लागतो.
करदात्यांच्या संख्येत होणार वाढ
येणाऱ्या काही वर्षात करदात्यांच्या संख्येत मोठी वाढ होईल असे मत अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केले आहे. करदात्यांची टक्केवारी 2047 पर्यंत 45% होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या नागरिक पारंपारिक गुंतवणुकीचे प्रकार बाजूला ठेवून एसआयपी, डीमॅट, शेयर मार्केट असे पर्याय निवडत असल्याचे निरीक्षण देखील अर्थमंत्र्यांनी नोंदवले. यात ग्रामीण आणि शहरी असे सर्वच स्तरातील लोक असल्याचे त्या म्हणाल्या.