राज्यभरात लंपी त्वचारोगामुळे अनेक जनावरे बाधित आढळली होती. या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये गुरांचा बाजार बंद करण्यात आला होता. तसेच जनावरांच्या शर्यती, प्रदर्शनही बंद ठेवण्याची सूचना पशुसंवर्धन विभागाने दिली होती. परंतु लंपी आजाराचा संसर्ग आटोक्यात आल्यामुळे राज्यभरातील गुरांचे बाजार पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
1 जानेवारीपासून पुणे, नाशिक सारख्या मोजक्या ठिकाणी गुरांचा बाजार भरत होता. आता मात्र राज्यभरातील सर्व गुरांचे बाजार पूर्वरत होणार आहेत. शेतकऱ्यांना आणि पशुपालन करणाऱ्या व्यावसायिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.