Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharashtra Budget 2023 : जाणून घ्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

Maharashtra Budget 2023

Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि.9 मार्च) 2023-24 या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या अर्थसंकल्पाचे अंदाजित आकारमान 5,47,449 कोटी रुपये इतके आहे. शिंदे-फडणवीस यांच्या युती सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समजातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि.9 मार्च) 2023-24 या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या अर्थसंकल्पाचे अंदाजित आकारमान 5,47,449 कोटी रुपये इतके आहे. शिंदे-फडणवीस यांच्या युती सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जणू काही 2024 च्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. या बजेटमधून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत ध्येयावर आधारित केंद्र सरकारच्या धर्तीवर अमृत काळातील राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. 

राज्याच्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

 • छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये
 • आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी
 • मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये
 • शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये
 • अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित
 • 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
 • 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा 5) पर्यावरणपूरक विकास
 • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी
 • महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा, आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून
 • राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार,5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करणार
 •  2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ देणार
 • मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार, या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार
 • काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना, 5 वर्षांसाठी 1325 कोटी
 • गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून लाभही 2 लाखांपर्यंत
 • नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार, 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार, 1000 कोटी रुपये निधी
 • श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात स्थापन करणार, 200 कोटी रुपयांची तरतूद
 •  नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार, 228 कोटींची तरतूद 
 • विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत, प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये 
 • विदर्भ-मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात दुग्ध विकासाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी 160 कोटी रुपये
 • धनगर समाजाला 1000 कोटी रुपये, महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार  विकास महामंडळ, 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज  देणार
 • मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी 50 कोटींचा मत्स्यविकास कोष विमा आणि डिझेल अनुदानाचा दिलासा
 • शेतकर्‍यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना, प्रलंबित कृषीपंपांना वीजजोडण्या
 •  दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्‍यांना लाभ
 • दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून
 • तापी महापुनर्भरण प्रकल्प,  कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प, या प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयांना सुधारित प्रशासकीय मान्यता
 • गोसिखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास यावर्षी 1500 कोटी, जून 2024 पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार
 • मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला
 • हर घर जल: जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद
 • जलजीवन मिशन : 17.72 लाख कुटुंबांना नळजोडणी, सुमारे 20,000 कोटी रुपये
 • 5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0
 • मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
 • महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट
 • माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
 • आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
 • गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये, अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
 • मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
 • अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
 • महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार
 • महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये
 • राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
 • संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये
 • विविध समाजघटकांच्या संस्थांसाठी भरीव निधी
 • नवीन महामंडळांची स्थापना, प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार
 • अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती
 • अल्पसंख्यक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 15 जिल्ह्यात 3000 बचतगटांची निर्मिती
 • यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख  घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’
 • 3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविणार
 • ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार
 • हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार, सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता
 • पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग/86,300 कोटी रुपये (नागपूर-गोवा)
 • हायब्रीड अ‍ॅन्युईटीतून 7500 कि.मी.चे रस्ते/90,000 कोटी रुपये
 • आदिवासी पाडे, बंजारा तांडे,  धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी 4000 कोटी
 • मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला 
 • 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी
 • शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी, छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी
 • गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण : 162.20 कोटी
 •  नागपूर येथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब
 • 500 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम, शहरांकडे ओढा थांबणार
 • विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत
 • शिक्षणसेवकांना भरघोस मानधन सरासरी 10 हजार रुपयांची वाढ
 • विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान
 • राज्यात 14 शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे
 • प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण
 • नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपये
 • 20,000 ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प
 • 12,793 कोतवालांचे मानधन सरसकट 15 हजार रुपये
 • महापुरषांच्या स्मारकांसाठी भरीव निधी
 • महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास
 • श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार
 • राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी : 50 कोटी रुपये
 • दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी : 115 कोटी रुपये
 •  प्रथम अमृत : शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, एकूण तरतूद   : 29,163 कोटी रुपये
 • द्वितीय अमृत : महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, एकूण तरतूद : 43,036 कोटी  
 • तृतीय अमृत : भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, एकूण तरतूद : 53,058 कोटी रुपये
 • चतुर्थ अमृत : रोजगारनिर्मिती, सक्षम, कुशल-रोजगारक्षम युवा विभाग, एकूण तरतूद : 11,658 कोटी रुपये
 • पंच अमृत पर्यावरणपूरक विकास एकूण तरतूद : 13,437 कोटी रुपये
 • राज्याचे एकूण उत्पन्न वर्ष 275786 कोटी इतके असून 
 • महिलांना आता मासिक 25,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त
 • दिव्यांग व्यक्तींच्या व्याख्याबदलामुळे असंख्य दिव्यांगांची व्यवसायकरातून सुटका
 • बृहन्मुंबई महापालिका, पुणे महापालिका आणि रायगड जिल्हा या तीन क्षेत्रात विमानचालन चक्की इंधनावरील (एटीएफ) मूल्यवर्धित कराचा दर 25 टक्क्यांहून आता 18 टक्के 
 • महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना-2023 जाहीर