Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Farm Pond : लॉटरी पद्धत बंद! आता मागेल त्याला सरकारी अनुदानातून शेततळे

Farm Pond : लॉटरी पद्धत बंद! आता मागेल त्याला सरकारी अनुदानातून शेततळे

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना यापूर्वी लॉटरी पद्धतीने अनुदान दिले जात होते. मात्र राज्याच्या कृषी विभागाने आता लॉटरी पद्धत बंद करून मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.कोरडवाहू शेती करताना कमी पाण्यामुळे कृषी उत्पादनावर परिणाम होतो आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला  शेततळे ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना यापूर्वी लॉटरी पद्धतीने अनुदान दिले जात होते. मात्र राज्याच्या कृषी विभागाने आता लॉटरी पद्धत बंद करून मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे देण्याचा निर्णय घेतला आहे. नेमके या योजनेचे स्वरुप काय आहे हे आपण जाणून घेऊयात.


लॉटरी पद्धती बंद, मागेल त्याला  शेततळे-

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला लॉटरी सिस्टीमनुसार शेततळे योजनेचा लाभ दिला जात होता.मात्र, आता सरकारने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरु करण्याचा निर्णय 15 जैलेच्या बैठकीत घेतला आहे. राज्य शासनाने राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतजमि‍नीसाठी नियमित आणि अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आखले आहे. त्यासाठी फेब्रुवारी 2016 मध्ये मागेल त्याला शेततळे योजना मंजूर करण्यात आली आहे. ही योजना शासनाची अत्यंत मात्वाकांक्षी योजना आहे.

शासनाकडून 50 % अनुदान

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येते. यासाठी सरकारकडून अनुदानही देण्यात येते. यामध्ये  30 x 30 x 3 मीटर, 15 x 15 x 3 मीटर, 20 x 15 x 3  अशा  प्रकारची शेततळे घेता यणार आहेत. मागेल त्याला शेततळे योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा शासनाचा निर्णय आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी शासनाकडून 50 % अनुदान दिले जा आहे. त्यामध्ये कमीत कमी 15x15x3 ते कमाल 30 x 30 x 3 मीटरच्या शेततळ्याचा समावेश आहे. यासाठी शासनाकडून किमान  25 हजार  ते कमाल 75,000/- रुपये इतके अनुदान दिले जाते.

या शेततळे योजनेसाठी लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. अर्ज केल्यानंतर यापूर्वी लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांना पात्रतेचा संदेश येत होता. मात्र, आता या योजनेसाठी कोणताही शेतकरी अर्ज करू शकणार आहे.

योजनेसाठी पात्रता

  • शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीतकमी 0.60 हेक्टर जमीन असावी यात कमाल मर्यादा नाही
  • लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्या करिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील
  • अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळे किंवा सामुदाईक रित्या शेततळ्याचा लाभार्थी नसावा
  • मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे
  • ही योजना फक्त महाराष्ट्रातील मूळ रहिवासी शेतकऱ्यांसाठी आहे

आवश्यक कागदपत्रे

  • जमिनीचा 7/12 उतारा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला (लागू असल्यास)
  • दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला
  • आधारकार्ड
  • 8 – अ प्रमाणपत्र