अरे यार! आधीच कमी पगार, तो ही वेळेवर होत नाही. त्यात किती ही बचत करण्याचा प्रयत्न केला तर होत नाहीच. चला, तर मग आपल्या पगारातून कशी बचत करायची? कशा पध्दतीने पगार हा पूर्ण महिना पुरवायचा? हे आपण जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
दर महिन्याला बचतीची सवय लावा
थेंबे थेंबे तळे साचे....हे उगीच नाही म्हणत. आपण जर महिन्याला कमी का होईना, पण पै-पै साठविला तर भविष्यात हा निधी एका मोठया आकडयात आपल्याला प्राप्त होईल. यासाठी आपल्याला मात्र बचत करण्याची सवय लावूनच घेतली पाहिजे. जर आपण गरज नसलेल्या वस्तूंवर खर्च केला नाही, तर तो पैसा बचत करता येईल. सोबतच आपल्या बाहेरील खाण्या-पिण्यावर, अधिक शॉपिंगवर नियंत्रित करणे आवश्यक आहे. खर्चाच्या बाबतीत काटकसर करण्यास शिकाल तर बचत कराल. बचतीसाठी शासनाच्या अनेक शासकीय योजनादेखील उपलब्ध आहेत. तसेच बॅंकादेखील नव-नव्या योजना घेऊन मार्केटमध्ये उतरत आहे. याचा फक्त अभ्यास करणे तुम्हाला गरजेचे आहे.
पैसा कमविण्याचा दुसरा माध्यमदेखील निवडा
देशातील वाढत्या महागाईमुळे पैसा कमविण्याचे दुसरे माध्यम निवडणे आवश्यक आहे. रिसेप्शन, कॉल सेंटर, छोटा-मोठा धंदा असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे तुम्ही एक संपूर्ण पगार बचत म्हणून ठेवू शकता. सोबतच विमा पॉलिसी काढून घ्या, संकटकाळात तुमच्या कुटुंबासाठी मोठा हातभार नक्कीच लागेल. जास्तीत- जास्त पॉलिसी काढून ठेवा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला शिक्षण, आरोग्य, लग्न यासाठी मदत होईल.
खर्चाची नोंद ठेवा
दर महिन्याला पगार जमा होतो. या पगारातून किती पैसे खर्च होतात, हे माहितच नसेल, तर बचत कशी होईल बुवा. यासाठी प्रत्येक खर्चाची नोंद ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून खर्चावर आळा घालून, बचत करता येईल. या स्मार्ट फोनच्या युगात खर्चाची नोंद करण्यासाठी गुगलवर अनेक अँपसुध्दा उपलब्ध आहेत. आपल्या मोबाईलमध्ये असे अँप डाउनलोड करा व चालता-फिरता छोटा-मोठा खर्च झाला तरी आपल्याला याची नोंद मोबाईलमध्ये करता येऊ शकेल.
शक्यतो कॅशबॅक व ऑफर्सचा लाभ घ्या
खर्च करताना कॅशबॅक व ऑफर्स आहेत, म्हणून खरेदी करू नका. आधी काय खर्च करायचा, त्यावर कॅशबॅक व ऑफर्स आहेत का? हे चेक करा. त्यानंतरच ती वस्तू खरेदी करा. ती वस्तू तत्काळ गरजेची नसेल, तर ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवर सेलची वाट पहा, मग त्या वस्तूवर चांगला डिस्काउंट मिळत असेल तर खरेदीस प्राधान्य द्या. आता, नवीन वर्षदेखील येत आहे, त्यामुळे चांगल्या कॅशबॅक व ऑफर्सचा लाभ घेण्यास विसरू नका.
सेकंड हॅंड वस्तू खरेदीस प्राधान्य
आपण फर्निचर, इलेक्ट्रिक वस्तू यासारख्या वस्तू सेकंड हॅंड खरेदी करू शकता. या वस्तू सेकंड हॅंण्ड कमी किंमतीत खरेदी करणे हादेखील एक बचतीचा भाग बनू शकेल. सेकंद हॅंड वस्तू खरेदीसाठी गुगलवर अनेक साइटदेखील उपलब्ध आहेत.