• 09 Feb, 2023 08:29

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EV charging stations: EV चार्जिंग स्टेशनवर व्हॉट्सअॅपनेही करता येईल पेमेंट

EV charging payment mode

चार्जिंग पॉइंटवर पेमेंट सुविधा सुलभ करण्यासाठी Log9 Mobility आणि Pulse Energy कंपन्या एकत्र आल्या आहेत. ग्राहकांना EV चार्जिग गेल्यानंतर व्हॉट्सअॅपवर आधारित पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

देशभरामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत असल्याने इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटची संख्याही वाढत आहे. मात्र, अद्यापही पुरेशा प्रमाणात चार्जिंग पॉइंटची सुविधा उभी राहिली नाही. यासाठीच्या पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक करण्यात येत आहे. चार्जिंग पॉइंटवर पेमेंट सुविधा सुलभ करण्यासाठी  Log9 Mobility आणि Pulse Energy कंपन्या एकत्र आल्या आहेत. ग्राहकांना EV चार्जिग गेल्यानंतर व्हॉट्सअॅपवर आधारित पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

देशभरातील हजारो चार्जिंग पॉइंटशी पल्स एनर्जी कंपनीने सहकार्य करार केला आहे. पल्स एनर्जी कंपनीचे देशभरामध्ये स्वत:चे 550 फास्ट चार्जिंग पॉइंट आहेत. या सुविधेमुळे ग्राहकांना पेमेंट करण्यासाठी सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे. भविष्यामध्ये देशभरामध्ये चार्जिग पॉइंटचे जाळे उभारण्यात येईल. ग्राहकांना पेमेंट करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न राहिली, असे Log9 Mobility कंपनीने म्हटले आहे.

इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी अनेक प्रकारचे अॅप आहेत. त्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडतो. यावर पर्याय म्हणून आम्ही पेमेंट करण्यासाठी वन स्टॉप सोल्युशन आणले आहे. ज्या चार्जिंग पॉइंट ऑपरेटर्सनी पल्स एनर्जी कंपनीसोबत सहकार्य करार केला असेल किंवा त्यांच्याकडे Log9's InstaCharge अॅप असेल त्यांना व्हॉट्सअप पेमेंट करता येणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

देशभरामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री वाढत आहे. येत्या काळात यामध्ये आणखी वाढ होणार आहे. मात्र, चार्जिंगची सुविधा फक्त शहरी भागांपुरतीच  मर्यादित आहे. ग्रामीण भागांमध्ये अद्याप EV चार्जिंग पॉइंट पुरेशा प्रमाणात नाहीत. इव्ही गाड्यांची विक्री वाढण्यासाठी चार्जिंग स्टेशन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वाहन निर्मिती कंपन्यांकडून हे काम थर्डपार्टी कंपन्यांना देण्यात येत आहे. मागील वर्षी देशभरामध्ये 60 हजार इव्ही गाड्यांची विक्री झाली. अनेक आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्या नवनवीन इलेक्ट्रिक गाड्यांचे मॉडेल्स बाजारात आणत आहेत.