Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget Masters of India: आतापर्यंत 26 फायनान्स मिनिस्टर्सनी सादर केले भारताचे बजेट, जाणून घ्या नावे

List of Finance Ministers who presented union budget

Budget Masters of India: चालू वर्ष हे भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृतमहोत्सवी वर्षासाठी सरकारने वर्ष 2022 च्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या होत्या. वर्षभर यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर करण्यात आली होती. आता आगामी बजेटमध्येही या विषयी मोठ्या घोषणा केंद्र सरकारकडून केल्या जाण्याची शक्यता आहे.

चालू वर्ष हे भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृतमहोत्सवी वर्षासाठी सरकारने वर्ष 2022 च्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या होत्या. वर्षभर यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर करण्यात आली होती. आता आगामी बजेटमध्येही या विषयी मोठ्या घोषणा केंद्र सरकारकडून केल्या जाण्याची शक्यता आहे.

गेल्या 75 वर्षात अर्थसंकल्पामध्ये अनेक बदल झाले. अर्थसंकल्प संसदेत सादर करण्याच्या दिवसापासून तो डिजिटल स्वरुपात आणण्यापर्यंत बजेट प्रवासातील सुधारणा दिसून आल्या. 75 वर्षात 73 पूर्ण बजेट संसदेत सादर करण्यात आली. तर  14 अंतरिम बजेट आणि 4 विशेष अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आली.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री आर.के. षणमुखम चेट्टी यांनी संसदेत सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे सुपूत्र सी.डी देशमुख यांनी  संसदेत सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. संसदेत सर्वाधिक वेळा बजेट सादर करण्याचा बहुमान तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांना आहे. त्यांनी 10 वेळा बजेट सादर केले. त्याखालोखाल तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 9 वेळा बजेट सादर केला आहे.

विद्यमान अर्थमंत्री निर्मला सितारामन येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी पाचव्यांदा संसदेत बजेट सादर करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचा हा 10 वा अर्थसंकल्प आहे. 

क्रमांकअर्थमंत्रीबजेट वर्षराजकीय पक्षपंतप्रधान
1आर.के षणमुखम चेट्टी1947-1948 आणि 1948-49भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसजवाहरलाल नेहरु
2जॉन मथाई1949-1950 आणि 1950-51भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसजवाहरलाल नेहरु
3सी.डी देशमुख1951-1952, 1952-53 (अंतरिम आणि पूर्ण बजेट), 1953-54, 1954-1955, 1955-56, 1956-57भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसजवाहरलाल नेहरु
4टी.टी.क्रिष्णामाचारी1957-1958(अंतरिम आणि पूर्ण बजेट) , 

1964-65

1965-1966
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

जवाहरलाल नेहरु 

गुलजारीलाल नंदा
लाल बहाद्दूर शास्त्री

5जवाहरलाल नेहरु 1958-59भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसजवाहरलाल नेहरु 
मोरारजी देसाई1959-1960 
1960-1961 
1961-1962 
1962-1963 (अंतरिम आणि पूर्ण बजेट) 
1963-1964 
1967-1968 (अंतरिम आणि पूर्ण बजेट) 
1968-1969 
1969-1970
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

जवाहरलाल नेहरु
इंदिरा गांधी
स्वत:

7सचिंद्र चौधरी1966-1967भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसइंदिरा गांधी
8इंदिरा गांधी1970-1971भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसइंदिरा गांधी
9यशवंतराव चव्हाण1971-1972भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसइंदिरा गांधी
10सी. सुब्रमण्यम1975-1976
1976-1977
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसइंदिरा गांधी
11एच. एम पटेल1977-78 (अंतरिम आणि पूर्ण बजेट)
1977-78
जनता पार्टी मोरारजी देसाई
12चरण सिंग  1979-1980जनता पार्टी (सेक्युलर)चरण सिंग
13आर. वेंकटरमण1980-81 (अंतरिम आणि पूर्ण बजेट)
1981-82
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसइंदिरा गांधी
14प्रणव मुखर्जी1982-1983 
1983-1984
1984-1985 
2009-2010 (अंतरिम आणि पूर्ण बजेट) 
2010-2011 
2011-2012 
2012-2013
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसइंदिरा गांधी


मनमोहन सिंग
15व्ही.पी सिंग1985-1986
1986-1987 
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसराजीव गांधी
16राजीव गांधी1987-1988भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसराजीव गांधी
17नारायण दत्त तिवारी1999-1989भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसराजीव गांधी
18एस.बी चव्हाण1989-1990भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसराजीव गांधी
19मधू दंडवते1990-91जनता दलव्ही.पी सिंग
20यशवंत सिन्हा1991-1992 (अंतरिम बजेट) 
1998-99 (अंतरिम आणि पूर्ण बजेट) 
1999-2000 
2000-2001 
2001-2002
2002-03
समाजवादी जनता पार्टीचंद्रशेखर

अटल बिहारी वाजपेयी
21मनमोहन सिंग1991-1992
1996-1997
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसपी.व्ही नरसिंह राव
22पी. चिदंबरम1996-1997 (पूर्ण) 
1997-1998 
2004-05 
2005-06 
2006-07 
2007-08 
2008-09 
2013-14 
2014-15 (अंतरिम)
तामिळ मनिला कॉंग्रेस

कॉंग्रेस
एच.डी देवेगौडा

इंदर कुमार गुजराल 

मनमोहन सिंग
23जसवंत सिंग2003-2004
2004-2005 (अंतरिम)
रालोआअटल बिहारी वाजपेयी
24अरुण जेटली2014-2015 (पूर्ण बजेट) 
2015-2016 
2016-2017 
2017-2018 
2018-2019
भाजपनरेंद्र मोदी
25पियुष गोयल2019-2020 (अंतरिम)भाजपनरेंद्र मोदी
26निर्मला सितारामन2019-2020 (पूर्ण बजेट)
2020-2021 
2021-2022 
2022-2023
भाजपनरेंद्र मोदी

माहितीचा स्त्रोत :www.news9live.com