Samsung Galaxy F04: स्मार्टफोन ब्रँड सॅमसंगने आपला नवीन मोबाइल Samsung Galaxy F04 भारतात लॉन्च करण्याची तयारी केली आहे. हा फोन जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होऊ शकतो. लॉन्च होण्यापूर्वीच फोनची टीझर इमेज लीक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फोन दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो. असेही म्हटले जात आहे की हा फोन Galaxy A04e चे री-ब्रँडेड व्हर्जन म्हणून लॉन्च केला जाईल. फोन लॉन्च करण्याबाबत कंपनीने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.
Samsung Galaxy F04 ची किंमत (Samsung Galaxy F04 Price)
प्राप्त माहितीनुसार हा मोबाइल 8 हजारांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केला जाऊ शकटतो. हा मोबाइल फ्लिपकार्टवरून विकला जाईल आणि त्याची सुरुवातीची किंमत 7,499 रुपये असू शकते. 8 जीबी रॅम आणि त्याचबरोबर हा फोन पर्पल आणि ग्रीन या दोन रंगांच्या ऑप्शनमध्ये असणार आहे, ही याची वैशिष्टे आहेत.
Samsung Galaxy F04 ची डिटेल्स (Details of Samsung Galaxy F04)
6.5-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करू शकते, जे HD Plus रिझोल्यूशनसह येईल. हा फोन वॉटर ड्रॉप-स्टाईल नॉचमध्ये लॉंच केला जाईल, ज्यामध्ये 5-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल. फोनसोबत 12 मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशलाइट सपोर्ट असेल. Galaxy F04 मध्ये ऑक्टा कोर प्रोसेसिंग पॉवर आणि 128 GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येते. फोनच्या बॅटरी क्षमतेबद्दल बोलायचे झाले तर, यासोबत एक मोठी 5,000 mAh बॅटरी उपलब्ध होणार आहे, जी टाइप-सी पोर्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल 4जी सिम सपोर्ट, वाय-फाय, ब्लूटूथ व्हर्जन 5.0 आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक सपोर्ट असेल.