Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Premium Collection: LIC च्या प्रीमियम कलेक्शनमध्ये 17 टक्क्यांनी वाढ, तरीही LIC दुसऱ्या क्रमांकावर!

LIC Premium Collection in 2022-23

Image Source : www.wikipedia.com

LIC Premium Collection: एलआयसीने 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 2 लाख कोटी रुपये प्रीमियम जमा केला आहे. हा प्रीमियम मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 17 टक्क्यांनी जास्त आहे; असे असले तरीही सर्वाधिक प्रीमियम जमा करण्यामध्ये LIC अजूनही दुसऱ्या क्रमांकाची कंपनीच आहे. मग पहिला क्रमांकावर कोणती कंपनी आहे?

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीमध्ये (LIC) भारतातील बहुसंख्य लोकांनी इन्शुरन्स व इतर योजनांद्वारे गुंतवणूक केली आहे. प्रीमियम इन्कमच्या हिशोबाने सध्या LIC कडे मार्केटमधील 62.58% हिस्सा आहे. कंपनीने नुकतीच मागील आर्थिक वर्षात जमा केलेल्या प्रीमियम संदर्भातील माहिती प्रसिद्ध केली. यात 2022-23 मध्ये LIC ने 2 लाख कोटी रुपयांचा प्रीमियम जमा केला आहे. हा प्रीमियम मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 17 टक्क्यांनी जास्त आहे.

2021-22 मध्ये कंपनीने 1.99 लाख कोटी रुपयांचा प्रीमियम जमा केला होता. विशेष म्हणजे सध्या मार्केटमध्ये अनेक विमा कंपन्या अतिशय उत्तम प्लॅन देत असतानाही आजही गुंतवणूकदार LIC ला प्राधान्य देताना पाहायला मिळत आहेत. LIC शिवाय अनेक खासगी विमा कंपन्यांनीही  ग्राहकांकडून मार्चमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रीमियम जमा केला आहे. कर सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी देखील अनेक गुंतवणूकदार पॉलिसी खरेदी करतात.

मार्च महिन्यात LIC अव्वल

केवळ मार्च महिन्यात LIC ने 10 हजार कोटी रुपयांचा प्रीमियम जमा केला आहे. हा प्रीमियम इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. LIC नंतर HDFC Life ने 2989.17 कोटी रुपयांचा प्रीमियम मिळवला आहे. एसबीआय लाईफ (SBI Life) कंपनीने  2318.77 कोटी तर टाटा एआयए लाईफ (Tata AIA Life) इन्शुरन्स कंपनीने 1884.41 कोटी रुपयांचा प्रीमियम मिळवला आहे.

LIC च्या ग्रुप सिंगल प्रीमियममध्ये 21.76% वाढ

LIC च्या 2022-23 वर्षात वैयक्तिक सिंगल प्रीमियममध्ये (Individual Single Premium) 3.30% वाढ झाली आहे. तर नॉन सिंगल प्रीमियममध्ये (Non-Single Premium) 10% वाढ झाल्याचे पाहायला मिळते. या प्रीमियम अंतर्गत 2021-22 मध्ये 5,501.12 कोटी रुपये जमा झाले होते. यात 10 टक्क्यांची वाढ पकडली तरी मार्च 2023 मध्ये एलआयसीकडे प्रीमियमद्वारे 6077.97 कोटी रुपये जमा झाले आहेत. तसेच सर्वात जास्त वाढ ही ग्रुप सिंगल प्रीमियममध्ये झाली आहे. ही वाढ 21.76% इतकी झाली आहे. 2021-22 मध्ये ग्रुप सिंगल प्रीमियम हा 1,37,350 कोटी इतका जमा झाला होता. जो 2022-23 मध्ये 1,67,235 कोटी रुपये इतका जमा झाला आहे.

HDFC Life कंपनीचा पहिला क्रमांक

LIC ने 2022-23 मध्ये भरपूर प्रीमियम जमा केलेला असला, तरीही सर्वाधिक प्रीमियम जमा करण्याच्या यादीत LIC दुसऱ्या क्रमांकावरच आहे. 2022-23 मध्ये सर्वाधिक प्रीमियम जमा करणारी पहिल्या क्रमांकाची कंपनी HDFC Life ठरली आहे. 2021-22 च्या तुलनेत या कंपनीने 18.83% जास्त प्रीमियम जमा केला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर LIC असून तिसऱ्या क्रमांकावर एसबीआय लाईफ (SBI Life) इन्शुरन्स कंपनी आहे. या कंपनीने 16.22% जास्त प्रीमियम जमा केला आहे. आयसीआयसीआय प्रुडेंशिअल लाईफ इन्शुरन्स (ICICI Prudential Life Insurance) कंपनीने 2022-23 वर्षात 12.55% अतिरिक्त प्रीमियम जमा केला आहे.

Source: hindi.moneycontrol.com