Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Mutual Fund : एलआयसीची मल्टीकॅप योजना आजपासून खुली, गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती जाणून घ्या!

LIC MF Multi Cap Fund

LIC MF Multi Cap Fund : एलआयसीची ही नवीन स्कीम स्मॉल, मिड आणि लार्ज कॅप कंपन्यांमध्ये 25 टक्के निदी गुंतवणूक करणार आहे. तर उर्वरित 25 निधी हा फंड मॅनेजरच्या निर्णयानुसार इतरत्र गुंतवला जाणार आहे. LIC Multi Cap चा NFO 20 ऑक्टोबरला बंद होणार आहे.

LIC MF Multi Cap Fund : भारतातील सर्वांत मोठी इन्श्युरन्स कंपनी एलआयसीच्या (Life Insurance of India-LIC) म्युच्युअल फंड विभागाने (LIC Mutual Fund) आज (दि. 6 ऑक्टोबर) नवीन स्कीम लॉन्च केली. एसआयसीने लॉन्च केलेल्या मल्टीकॅप प्रकारातील योजनेचे नाव एलआयसी म्युच्युअल फंड मल्टी कॅप फंड (LIC MF Multi CAP Fund) आहे. हा नवीन ऑफर म्हणजेच न्यू फंड ऑफर (NFO) आजपासून ओपन झाली असून ती 20 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. मल्टीकॅप फंडमधील निधी सर्व प्रकारच्या म्हणजे लहान, मध्यम आणि मोठ्या अशा सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवला जातो.

मल्टीकॅप फंड म्हणजे काय? What is Multi Cap fund?

वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट भांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारा फंड म्हणजे मल्टिकॅप फंड (Multi Cap Fund) होय. सेबी (SEBI)ने घालुन दिलेल्या नियमानुसार, या फंडातील किमान 65 टक्के निधी हा इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित स्टॉकसमध्ये गुंतवणे बंधनकारक आहे. मल्टिकॅप फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप अशा तिन्ही प्रकारची गुंतवणूक असते. म्हणूनच या फंडला वैविध्यपूर्ण फंड म्हटले जाते.

गुंतवणूक कशी करू शकतो?

LICच्या मल्टीकॅप फंडमध्ये कमीतकमी 5 हजार रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही 1 रुपयांच्या पटीत कितीही रक्कम गुंतवू शकता. तसेच याच्या अर्जासाठी अतिरिक्त 500 रुपये भरावे लागतात. या फंडमध्ये रेग्युलर आणि डायरेक्ट (Regular & Direct Scheme) असे दोन पर्याय आहेत. यासाठी इन्ट्री लोड काहीच नाही. पण यावर एक्झिट लोड 12 टक्के आहे. तसेच यासाठी कोणताही लॉक-इन पिरिअड नाही.

LIC MF Multi Cap fund-1
Image Source : www.linkedin.com 

सेबीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एलआयसी म्युच्युअल फंड कंपनी या स्कीमधील निधी लार्ज, मिडिअम आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये 25 टक्के निधी गुंतवणार आहे. तर उर्वरित 25 टक्के निधी फंड मॅनेजर्सच्या निर्णयानुसार इतत्र गुंतवला जाणार आहे. या फंडचा परतावा हा निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 निर्देशांकावर (Nifty 500 Multi Cap 50:25:25) आधारित असणार आहे. या फंडचे व्यवस्थापक (Fund Manager) एलआयसी म्युच्युअल फंडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी योगेश पाटील असणार आहेत.

इक्विटी मल्टीकॅपमधून मिळणारा परतावा किती?

इक्विटी मल्टीकॅप म्युच्युअल फंडचा विचार केला तर या फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळू शकतात. खाली दिलेल्या तक्त्यानुसार एका फंडने 3 वर्षात 38 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. पण मिडकॅप योजनेमधून मिळणारा सरासरी परतावा हा 20 ते 22 टक्क्यांच्या आसपास आहे. तर 5 वर्षातील रिटर्नची टक्केवारी ही 13 टक्के आहे.

LIC Multicap Fund Return