LIC Child Plan : मुलांच्या भविष्याचे नियोजन म्हणून मुलांच्या लहानपणीच कोणत्या ना कोणत्या योजनेत पैशाची गुंतवणूक करण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. यात एलआयसीनेही (Life Insurance Corporation-LIC) वेगवेगळ्या योजना तयार केल्या आहेत. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एलआयसीचे हे 3 प्लॅन तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. जे त्याला जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर उपयोगी पडू शकतात.
एलआयसी न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन (LIC New Children Money Back Plan)
हा विमा घेण्यासाठी 0 ते 12 वर्ष अशी वयाची अट आहे. कमीतकमी 10 हजार रुपयांचा विमा काढता येतो. या प्लॅन मध्ये 2 प्रकारे परतावा मिळवता येतो. पहिल्या पर्यायानुसार तीन वेळा मनी बॅक मिळतो. जेव्हा मूल 18 वर्षाचे होते तेव्हा विमा रकमेच्या 20 टक्के, 20 वर्षाचा झाल्यावर पुन्हा 20 टक्के आणि 22 वर्षांचा झाल्यावर परत 20 टक्के मनी बॅक मिळतो. यानंतर मूल 25 वर्षाचे झाल्यावर पॉलिसी मॅच्युअर होते. तेव्हा उरलेले चाळीस टक्के आणि त्यावरील एकूण बोनस मिळतो. जर तुम्हाला मध्येच पैसे नको असतील तर ते मॅच्युरिटीनंतर घ्यायचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.
एलआयसी जीवन लक्ष्य (LIC Jeevan Lakshya Plan)
हा प्लॅन पालकानाही घेत येतो. ही पॉलिसी पालकांच्या नावावर घेऊन नॉमिनी म्हणून मुलाना ठेवता येते. यामध्ये 13 ते 25 वर्षाचा पॉलिसी कालावधी असतो. 18 ते 50 वर्षे वयाचे पालक ही पॉलिसी घेऊ शकतात. कमीतकमी एक लाखाची ही पॉलिसी आहे. प्रीमियम वेवर बेनीफिट रायडर यामध्ये उपलब्ध आहे. विमाधारकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आले तर नॉमिनी म्हणजेच पाल्याला दरवर्षी विमा रकमेच्या 10 टक्के पैसे मिळत जातील. तसेच भविष्यातील सर्व हफ्ते माफ होतील. पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर इन्शुरन्स रकमेच्या 110 टक्के रक्कम आणि त्यावर बोनस दिला जातो.
एलआयसी जीवन तरुण योजना (LIC Jeevan Tarun Policy)
ही पॉलिसी 0 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी आहे. याची कमीत कमी विम्याची रक्कम 75 हजार रुपये आहे. ही पॉलिसी मुलांच्या नावावर घेता येते. जीवन तरुण योजना (Jeevan Tarun Policy) ही एक नॉन लिंकड, प्रॉफिट शेअर करणारी सिमित प्रीमियम पॉलिसी आहे. पाल्याच्या सुरक्षित भविष्याचे आणि बचतीचे मिश्रण आहे. यातही परताव्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. यानुसार, तुम्ही 20 वर्षे झाली की 5, 10 किंवा 50 टक्के आणि 25 व्या वर्षी पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर असे पर्याय निवडू शकता.
मुलांच्या भवितव्याचे आर्थिक नियोजन करताना त्याला वयाच्या कोणत्या टप्प्यावर कोणत्या महत्वाच्या गरजा असतात. त्यादृष्टीने किती खर्च होऊ शकतो. तुमचे बजेट काय आहे? याचा सारासार विचार करून नियोजन करणे योग्य ठरू शकते.