भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. या कंपनीत आपल्यापैकी अनेकांनी वेगवेगळे प्लॅन असणारे इन्शुरन्स खरेदी केले आहेत. नुकतेच एलआयसीने स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये (Steel Authority of India) आपली भागीदारी 2 टक्क्यांनी वाढवली आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ही देशातील स्टील उत्पादन करणारी कंपनी आहे. एलआयसीने ही गुंतवणूक ऑक्टोंबर 2022 पासून ते मार्च 2023 दरम्यान वाढवली आहे. एलआयसीने शेअर मार्केटमध्ये दिलेल्या सूचनेमध्ये या गुंतवणुकीची माहिती दिली आहे. एलआयसी शेअर मार्केटमधील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुक करत असते. विशेष म्हणजे एलआयसी आणि SAIL दोन्ही भारत सरकारच्या मालकीच्या कंपन्या आहेत.
एकूण किती रुपयांची गुंतवणुक केली?
एलआयसीने (LIC) दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर 2022 ते 8 जून 2023 दरम्यान 547 कोटी रुपयांची गुंतवणुक सेल (Steel Authority of India) कंपनीमध्ये केली आहे. या गुंतवणुकीसह सुमारे 8.26 कोटी शेअर्स कंपनीने खरेदी केले आहेत. एलआयसीने हे शेअर्स सरासरी 66.18 रुपये प्रति शेअर (Per Share) दराने खरेदी केले आहेत.
सेल कंपनीच्या शेअर्सचे अपडेट जाणून घ्या
या दरम्यान सेल कंपनीचे शेअर्स शुक्रवारी (9 जून 2023) एनएसईवर (NSE) घसरताना पाहायला मिळाले. ही घसरण 1.31% झाली असून 82.95 रुपयांनी शेअर मार्केट बंद झाले. मागील एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 1.19% घसरण पाहायला मिळाली. मात्र गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 13.17% वाढ झाली आहे.
LIC करू शकते 2.4 लाख कोटींची गुंतवणूक
एका मीडिया रिपोर्टनुसार, LIC ने चालू आर्थिक वर्षात सुमारे 2.4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. ही गुंतवणूक शेअर बाजारातील कंपन्यांव्यतिरिक्त देशात व्यवसाय करणाऱ्या अनलिस्टेड कंपन्यांमध्ये सुद्धा केली जाणार आहे. ही गुंतवणूक एलआयसीच्या आर्थिक वर्षातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरू शकते. या गुंतवणुकीमुळे केवळ एलआयसीला नाही, तर पॉलिसीधारकांना ही जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये बरेच चढ उतार होत असताना कंपनीने ही गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
Source: hindi.moneycontrol.com