जर तुम्ही एलआयसी च्या चांगला परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एलआयसीची आधार शिला योजना तुम्हाला माहिती असायला हवी. याद्वारे दररोज अल्पबचत करून तुम्ही सहज चांगला परतावा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला रोज फक्त 58 रुपये गुंतवावे लागतील आणि तुम्हाला मॅच्युरिटीनंतर एक मोठी रक्कम मिळेल.
जाणून घेऊयात काय आहे ही योजना?
एलआयसी ( LIC) च्या या योजनेत, 8 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. अनेकांना माहिती असेल की LIC हा भारत सरकारचा एक उपक्रम असून, गेल्या कित्येक वर्षांपासून विमा सुविधा देण्याचे काम ही संस्था करत आहे. देशभरातील करोडो लोक आजही LIC आणि पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करतात. चांगल्या परताव्याची हमी आणि सुरक्षित ठेव या कारणांमुळे या योजना गावखेड्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. एलआयसी आधार शिला पॉलिसी ही महिलांसाठी खास बनवलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर गुंतवणूक केलेले सर्व पैसे व्याजासह नॉमिनीला दिले जातात.
एलआयसी आधार शिला पॉलिसीची वैशिष्ट्ये
- एलआयसी आधार शिला योजना खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे.
- पॉलिसीची किमान मुदत 10 वर्षे आणि कमाल 20 वर्षे आहे.
- या योजनेच्या मॅच्युरिटीचे कमाल वय 70 वर्षे आहे.
- पॉलिसी धारक (LIC India) पॉलिसी घेतल्यानंतर 5 वर्षांनी मरण पावला, तर अशा परिस्थितीत कुटुंबाला मॅच्युरिटीवर लॉयल्टी सुविधा मिळेल.
- पॉलिसी मुदत संपल्यावर एकरकमी रक्कम देखील प्राप्त होईल.
- योजनेअंतर्गत, तुम्ही किमान 75000 रुपये आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपये गुंतवू शकता.
- मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर या योजनेचा प्रीमियम भरण्याचा पर्याय आहे.
गुंतवणुकीवर तुम्हाला मिळेल मोठी रक्कम!
समजा, वयाच्या 30 व्या वर्षी तुम्ही या योजनेत सलग 20 वर्षे दररोज 58 रुपये जमा केले, तर तुमच्या पहिल्या वर्षी एकूण 21170 रुपये जमा होतील. ज्यावर तुम्हाला 4.5 टक्के दराने कर भरावा लागेल. दरवर्षी प्रीमियम भरल्यावर तुम्ही 20 वर्षांसाठी 429392 रुपये जमा कराल. यानंतर, मॅच्युरिटीच्या वेळी, तुम्हाला एकूण 794000 रुपये मिळतील. अल्पबचत करून एक स्मार्ट गुंतवणूक तुम्हांला चांगला परतावा देऊ शकेल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            