Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nexus Select Trust REIT IPO : नेक्सस सिलेक्ट ट्रस्टचा 4000 कोटींचा REIT IPO, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक संधी

Nexus Select Trust REIT IPO , IPO, REIT

Nexus Select Trust REIT IPO : रिअल इस्टेटमधील आघाडीची कंपनी असलेल्या नेक्सस सिलेक्ट ट्रस्टने भारतातील पहिल्या REIT Public Offer साठी सेबीकडे प्रस्ताव सादर केला आहे. नेक्सस सिलेक्ट ट्रस्टमध्ये ब्लॅकस्टोन या कंपनीची मोठी गुंतवणूक आहे.

वैयक्तिक गुंतवणूकदारांना थेट Real Estate Investment Trust (REIT) मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.रिअल इस्टेटमधील आघाडीची कंपनी असलेल्या नेक्सस सिलेक्ट ट्रस्टने (Nexus Select Trust file draft papers of pubic issue) REIT Public Offer साठी सेबीकडे प्रस्ताव सादर केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना थेट गुंतवणूक करता येणारा भारतातील चौथा  REIT IPO आहे.

नेक्सस सिलेक्ट ट्रस्टमध्ये ब्लॅकस्टोन (Blackstone) या कंपनीची मोठी गुंतवणूक आहे. नेक्सस सिलेक्ट ट्रस्टचे भारतातील 14 शहरांमध्ये 17 शॉपिंग मॉल आहेत. कंपनीच्या मालकीचे एकूण 10 दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळ असून त्याचे मूल्य 3 बिलियन डॉलर्स आहे. कंपनीना मालमत्ता भाड्यावर देऊन उत्पन्न मिळते. कंपनी 500 मिलियन डॉलर्स ( भारतीय चलनात 4000 कोटी) उभारणार आहे.  2023 मधील पहिल्या सहामाहीत हा इश्यू बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

नेक्सस सिलेक्ट ट्रस्टचे नेतृत्व दिलीप सेहगल करत असून जवळपास 500 कर्मचारी आहेत. याशिवाय संचालक मंडळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी संचालकांचा समावेश आहे. यापूर्वी एप्रिल 2019 मध्ये Embassy Office Parks  या कंपनीचा  REIT इश्यू बाजारात आला होता. REIT मधून Embassy Group ने 4750 कोटी उभारले होते.  ऑगस्ट 2020 मध्ये के. रहेजा कंपनीने 4500 कोटी REIT मधून उभारले होते. तिसरा REIT इश्यू ब्रुकफिल्ड कंपनीने आणला आणि त्यातून 3800 कोटी उभारले होते.

नेक्सस सिलेक्ट ट्रस्टचा उत्पन्नाचा स्त्रोत (Rental Income)

मागील तीन नेक्सस ट्रस्टने 3.5 दशलक्ष चौरस फूट जागा भाड्याने दिली आहे. कंपनीकडे एकूण 10 दशलक्ष चौरस फूट जागा आहे. त्यात दक्षिण दिल्लीमधील सिटीवॉक मॉलचा समावेश आहे. या मॉलमध्ये 3000 स्टोअर्स असून 1000 ब्रॅंड्स खरेदीसाठी उपलब्ध आहेत. 17 शॉपिंग मॉलमधील 94% जागा वापरली जात आहे. त्यातून कंपनीला नियमित उत्पन्न मिळत आहे.  

रिअल इस्टेटमध्ये बूम ठरतेय कंपन्यांसाठी संधी (Real Estate Booming)

भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात मागील काही वर्षांपासून झपाट्याने वृद्धी झाली आहे. ब्लॅकस्टोन रिअल इस्टेटबाबत खूप आशावादी आहे. वेगाने होणारे शहरीकरण रिअल इस्टेट क्षेत्रासाठी वृद्धीच्या अमाप संधी उपलब्ध करत आहे. त्याशिवाय नव्याने वसणारी शहरे, बिझनेस हब, औद्योगिक केंद्रांमुळे कमर्शिअल प्रॉपर्टी मार्केटमध्ये देखील तेजी आहे. कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थव्यवस्था सावरली आहे. येत्या काळात रिअल इस्टेटमध्ये मोठी वृद्धी होईल, असा अंदाज ब्लॅकस्टोनने व्यक्त केला आहे.

REIT म्हणजे काय?  What is the meaning of REIT?

REIT Real Estate Investment Trust ही एक कंपनी किंवा विश्वस्त संस्था आहे  जी रिअल इस्टेटमधील नव्या प्रकल्पांना वित्त पुरवठा करते. रिअल इस्टेट कंपन्यांना   REIT ने आखून दिलेल्या नियमांची पूर्तता करावी लागते. किरकोळ गुंतवणूकदारांना रिअल इस्टेटमध्ये थेट गुंतवणुकीची संधी REIT मधून मिळते. बहुतांशी REIT इश्यू मोठ्या शेअर बाजारात लिस्ट होतात. REIT मधील गुंतवणुकीचे अनेक फायदे गुंतवणूकदारांना मिळतात. REIT ही म्युच्युअल फंडांप्रमाणे काम करते.