जपानी कार निर्मिती कंपनी लेक्ससने विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. ३.२ टक्क्यांपर्यंत गाड्यांच्या किंमती वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात टाटा, ह्युंदाई, मारुती सुझुकी, होंडा, स्कोडा या कंपन्यांनीही नव्या वर्षात किंमत वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार १ जानेवारीपासून नव्या किंमती लागू झाल्या आहेत. महागाई, उत्पादन खर्च, किंमतीती अस्थिरतेमुळे दरवाढ करावी लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कोणत्या मॉडेल्सच्या किंमती वाढणार?
कंपनीने हायब्रीड मॉडेलमधील गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. यामध्ये 500h, LS 500h, NX 350h and ES 300h या मॉडेल्सचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय चलन दरातील चढउतार, कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीमुळे गाड्यांच्या किंमती वाढवाव्या लागल्या. तरीही आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम सेवा आणि अनुभव देण्याचा प्रयत्न करू. किंमती वाढवताना त्याचा ग्राहकांवर विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घेतल्याचे लेक्सस इंडियाने अध्यक्ष नवीन सोनी यांनी म्हटले.
www.autotrader.ca
कंपनीकडून सध्या विविध श्रेणीतील हायब्रीड इलेक्ट्रिक वाहने बाजारात आहेत. यामध्ये LC 500h, LS 500h, NX 350h, ES 300h आणि नव्यानेच दाखल झालेल्या RX गाडीचा समावेश आहे. लेक्सस कंपनी फक्त आलिशान गाड्यांची निर्मिती करते. 50 लाखापासून 2 ते 3 कोटीपर्यंतची मॉडेल्स बाजारात विक्रीस आहेत. नव्याने बाजारत दाखल होत असलेल्या RX गाडीच भारतातील एक्स शोरुम किंमत 1 कोटी 10 लाख रुपये आहे.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सर्वच कार निर्मिती कंपन्यांनी किंमत वाढीची घोषणा केली होती. त्यानुसार १ जानेवारीपासून बहुतांश गाड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारची कठोर नियमावली यामुळे कंपन्यांच्या खर्चात वाढ होत आहे. या वर्षीपासून BS6 ही नियमावली लागू होणार आहे. त्यासाठी कंपन्यांना प्रदूषण कमी करण्यासाठी अतिरिक्त फिचर्स द्यावे लागणार आहेत. मात्र, मागील वर्षात देशात वाहन कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. गाड्यांच्या किमती जरी वाढत असल्या तरी ग्राहक गाडी घेण्यास इच्छुक आहेत.