Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Legal Verification For Home Loan: गृहकर्जासाठी कायदेशीर पडताळणी किती महत्त्वाची आहे?

Legal Verification For Home Loan

Image Source : www.blog.hashching.com.au

Legal Verification For Home Loan: गृहकर्जासाठी कायदेशीर पडताळणी करणे केव्हाही चांगले. याचा फायदा कर्जदाराला आणि बँके अशा दोघानांही होतो.

Legal Verification For Home Loan: प्रत्येकाला आपल्या स्वप्नातले घर(Dream Home) खरेदी करण्याची ईच्छा असते. पण हे घर खरेदी करण्यासाठी कधीही आपल्याकडे एकरकमी रोख(Cash) पैसे नसतात. अशा वेळी मदत बँकेकडून आर्थिक मदत(Bank Financial Help) घ्यावी लागते. यासाठी हल्ली प्रत्येक बँकेकडून गृहकर्जाची सुविधा(Home Loan Facility) देण्यात येते. यासाठी अर्जदाचा CIBIL स्कोर देखील तपासला जातो. गृहकर्ज देण्यापूर्वी वित्तीय संस्थेकडून कायदेशीर(Legal Verification) आणि तांत्रिक पडताळणीही करण्यात येते.  ही पडताळणी प्रक्रिया का आवश्यक असते? असा कधी तुम्ही विचार केलाय.या पडताळणीचे महत्त्व आणि फायदे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

कायदेशीर पडताळणी प्रक्रिया(Legal Verification Process)

कायदेशीर पडताळणी प्रक्रिया गृहकर्जाकरिता(Home Loan) देण्यात आलेली सर्व आवश्यक कागदपत्रे(IMP Document) योग्य आहेत याची खात्री करते आणि कर्जदाराच्या बाजूने कर्ज धोक्यात आणणारे कोणतेही कायदेशीर अडथळे नाहीत याची देखील खात्री करून घेते. या प्रक्रियेदरम्यान, हे व्हेरिफाय केले जाते की मालमत्तेवर दुसरा कोणताही धारणाधिकार नाहीये तर ती मालमत्ता कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या ताब्यात असणार आहे.

कायदेशीर पडताळणी प्रक्रिया ही किचकट असून गृहकर्ज देण्यापूर्वी  अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

  1. गृहकर्जासाठी अर्ज करताना कर्जदार बँक किंवा कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थेकडे कागदपत्रे सादर करतो, तेव्हा कायदेशीर पडताळणीच्या प्रक्रियेला सुरूवात होते
  2. मालमत्ता विकण्याच्या कराराची मूळ प्रत, मालमत्ता कर भरल्याची पावती आणि आवश्यक ती कागदपत्रे जसे की ब्ल्यू प्रिंट किंवा घराचा फ्लोअर प्लॅन(Floor Plan) सादर करणे गरजेचे असते 
  3. कर्जदार जेव्हा आवश्यक कागदपत्रे सादर करतो तेव्हा कायदेशीर पडताळणी प्रक्रियेला सुरूवात होते. 
  4. तांत्रिक पडताळणीसाठी संबंधित सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती सादर कराव्या लागतात
  5. त्यानंतर कर्ज देणारी बँक किंवा वित्तीय संस्था कायदेशीर तपासणी करण्यासाठी  वकिलांच्या तज्ज्ञ मंडळींना ही कागदपत्रे तपासण्यास देतात 
  6. कायदेशीर पडताळणी प्रक्रिया ही दोन टप्प्यात पूर्ण होत असून पहिली पायरी म्हणजे मालमत्तेचे मूल्यांकन(Property Valuation) आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात
  7. टायटल रिपोर्ट(Title Report) तयार केला जातो

कायदेशीर पडताळणी प्रक्रियेनंतर तांत्रिक व्हेरिफिकेशन केले जाते. यामध्ये गृहकर्ज देण्यापूर्वी मालमत्तेची भौतिक स्थिती तपासण्यात येते. तज्ज्ञांची एक टीम मालमत्तेच्या स्थानाला भेट देऊन मूल्यांकन करते. यामध्ये, कर्जदाराने लागू केलेल्या कर्जाची रक्कम आणि मालमत्ता मूल्याचे मूल्यांकन करण्यात येते.

कायदेशीर पडताळणी करणे का आवश्यक आहे?(Importance Of Legal Verification)

सुरक्षितता(Safety)

वित्तसंस्थेद्वारे गृहकर्ज जारी करण्यापूर्वी कायदेशीर पडताळणी केल्यामुळे मालमत्ता सुरक्षित असल्याची खात्री होते. त्यावर इतर कोणाचाही अधिकार नाही हे समजते. एकूणच मालमत्ता कायदेशीर वादापासून मुक्त आणि सुरक्षित असल्याची खात्री होते. जमिनीबाबत कोणतीही कायदेशीर अडचण आल्यास वित्तीय संस्थेला अडचणींना सामोरे जावे लागू शकते, ते टाळण्यासाठी कायदेशीर पडताळणी करणे अत्यंत गरजेचे आहे.

मालमत्तेचे वाजवी मूल्य(Fair value of assets)

मालमत्तेची योग्य किंमत तपासल्यानंतर कर्ज दिले जाते. तांत्रिक पडताळणीमध्ये  कर्जदाराला कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी मदत करते, ज्यासाठी तो प्रत्यक्षात पात्र आहे.

कर्जदारासाठी सोय(Convenience for Borrower)

कायदेशीर आणि तांत्रिक पडताळणीनंतर बँका बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्प तयार करण्यासाठी आर्थिक मदत करतात. अशा परिस्थितीत कर्जदाराला आपण कर्ज फेडू शकतो ही पत फक्त सिद्ध करायला लागते.

जोखीम(Risk)

कायदेशीर पडताळणी प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची जोखीम निदर्शनास आली तर कर्ज वाटपाची शक्यता कमी होते. वास्तविक कर्ज देणाऱ्या संस्थांना कर्ज बुडण्याची भीती असल्यामुळे असे होते.