Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

CIDCO Mega Housing Scheme 2022: सिडकोच्या महागृहनिर्माण दिवाळी 2022 योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी केवळ एक दिवस बाकी

CIDCO Mega Housing Lottery 2022

Image Source : www.constructionworld.in

CIDCO Mega Housing Scheme 2022: उलवे नोडमधील बामणडोंगरी रेल्वे स्थानक, खारकोपर पूर्व 2ए, खारकोपर पूर्व 2बी आणि खारकोपर पूर्व पी3 येथे 7849 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

CIDCO Mega Housing Scheme 2022: नवी मुंबईसारख्या(Navi Mumbai) सोयीसुविधांनी परिपूर्ण शहरात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिडकोने दिवाळीमध्ये महागृहनिर्माण योजना 2022 आणली होती. या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी फक्त 1 दिवस उरला आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 6 जानेवरी 2023 आहे. यासंदर्भातील पोस्ट सिडकोच्या अधिकृत ट्विटर(twitter Account) अकाऊंटवरून देण्यात आली आहे. आगामी काळात नावारूपाला येणाऱ्या उलवे नोडमध्ये तुम्हाला देखील तुमच्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करायचे असेल तर नक्कीच तुम्ही अर्ज करा.  

सर्वोत्तम कनेक्टीव्हीटीचे ठिकाण 'उलवे'

महागृहनिर्माण योजना दिवाळी-2022 अंतर्गत वेगाने विकसित होत असलेल्या उलवे(Ulwe) नोडमधील बामणडोंगरी रेल्वे स्थानक(Bamandongri Railway Station), खारकोपर पूर्व 2ए, खारकोपर पूर्व 2बी आणि खारकोपर पूर्व पी3 येथे 7849 सदनिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत(PMAY) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गृहनिर्माण योजनेद्वारे रेल्वे महामार्ग(Railway), एमटीएचएल(MTHL) यांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेल्या व आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या(Navi Mumbai International Airport) सान्निध्यात उलवे नोडमध्ये(Ulwe) हक्काचे घर घेण्याची संधी नागरिकांना प्राप्त झाली आहे.