Demat Two Way Authentication : जे ग्राहक डिमॅट खात्याचा वापर करत आहेत; त्यांच्यासाठी Two Way Authentication ही प्रणाली सुरू करण्याची आज (दि. 30 सप्टेंबर) शेवटची संधी आहे. जून महिन्याच्या सुरूवातीला नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE)ने नोटीफिकेशन काढून डीमॅट खात्याचे बायोमॅट्रिक ऑथेंटीकेशन/पासकोड किंवा फेस रिकगनेशन अॅक्टीव्ह करून टू वे ऑथेंटीकेशन (Two Way Authentication) करण्याबाबत सूचित केले होते.
डिमॅट खाते म्हणजे काय? What is Demat Account?
भारतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment in Share Market) करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना शेअर्सची खरेदी आणि विक्री करण्यासाठी डिमॅट खात्याची (Demat Account) आवश्यक असते. Demat Account हे गुंतवणूकदारांचे शेअर्स आणि सिक्युरिटीज जसे की म्युच्युअल फंड, बॉण्ड्स इत्यादी (Shares, Securities such Mutual Fund, Bonds etc.) डिजिटल स्वरूपात ठेवण्याचे एक व्यासपीठ आहे. डीमॅट हा 'डीमटेरियलाइज्' या शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे. (Demat’s fullform is Dematerialisation) याचा अर्थ प्रत्यक्ष फिजिकल शेअर्स हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित' असा होतो.
डीमॅट खाते हे गुंतवणूकदाराच्या ट्रेडिंग खात्याशी जोडलेले असते. यामुळे गुंतवणूकदाराला ऑनलाईन ट्रेडिंग करणे सोयीचे होते. भारतात डीमॅट खात्याची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. तसेच ही सेवा प्रामुख्याने NSDL आणि CDSL या दोन डिपॉझिटरी संस्थांद्वारे पुरविली जाते. NSDL आणि CDSL या शेअर मार्केट ब्रोकर, बॅंका यांच्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करतात.
ऑथेंटिकेशन म्हणजे काय? What is Authentication?
कोणत्याही खात्याचे ऑथेंटिकेशन हे युझर्सच्या सोयीप्रमाणे होते. जसे की, युझर्सला माहीत असलेल्या एखाद्या गोष्टीद्वारे म्हणजे, पासवर्ड, वन-टाइम पासवर्ड (OTP) किंवा ऑथेंटिकेटर अॅपवर तयार केलेले टोकन, बायोमेट्रिक फीचर्स, युझर्सने ठरवलेले एखादे नाव, फिंगरप्रिंट, चेहऱ्याचे स्कॅनिंग किंवा आवाज (Password, OTP, Token, Biometric Authentication, User’s Name, Fingerprint, Face Recognition or Voice Recognition) याद्वारे करता येते.
Two Factor Authentication कसं सुरू करायचं?
एनएसई (NSE) ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या नोटीफिकेशनमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, युझर किंवा गुंतवणूकदार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा वापर करू शकतात. ज्या गुंतवणूकदारांना बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन ज्यांना शक्य नाही ते युझर आयडी, किंवा ईमेल-मोबाईल नंबरचा वापर करून ओटीपीद्वारे Two Factor Authentication सुरू करू शकतात.
गुंतवणूकदारांनी आजच आपल्या डीमॅट खात्याचे Two Factor Authentication करून घ्यावे. अन्यथा उद्यापासून त्यांना त्याचा वापर करता येणार नाही.