Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Laptop Charging Issue: लॅपटॉपची बॅटरी चार्ज होत नसेल तर घरच्या घरी हा उपाय करुन पाहा, होईल हजारोंची बचत

Laptop battery Charging Issue

Laptop Battery Charging Issue: तुमच्यासोबत असे घडले असेल की, तुम्ही लॅपटॉपवर काम करत असताना अचानक स्क्रीनवर पॉप-अप नोटिफिकेशन येते की, लॅपटॉपची बॅटरी संपली आहे. यानंतर चार्जर शोधण्यासाठी तुमची धावपळ सुरू होते. लॅपटॉप बंद होण्यापूर्वी तो प्लग इन करण्याचा तुमचा प्रयत्न असतो. मात्र बऱ्याच वेळा लॅपटॉप चार्जरला कनेक्ट करूनही चार्ज होत नाही. अशावेळी तुम्ही खालील पर्यायाचा वापर करू शकता.

लॅपटॉप डिस्चार्ज झाल्यानंतर चार्जिंग प्लग कनेक्ट करूनही तुम्हाला स्क्रीनवर कुठलेही बदल दिसत नाहीत. खूप वेळानंतरही हे बदल दिसत नसतील तर त्यावेळी निश्चितपणे लॅपटॉपच्या बॅटरीत बिघाड झालेला असतो.

बॅटरीची काळजी घेण्याची योग्य पद्धत (Proper Battery Care)

लॅपटॉपच्या बॅटरीची काळजी घेण्याचे अनेक मार्ग असू शकतात. भिंतीवरील खराब सॉकेट किंवा डीवाइसमध्ये अशा अनेक अडचणी असू शकतात, ज्यामुळे तुमच्या लॅपटॉपची बॅटरी चार्ज होत नाही. समस्या काय आहे हे जाणून घेतल्यास, आपण तोडगा काढण्यासाठी केलेल्या खर्चात बचत करू शकतो. या तांत्रिक समस्यांचे समाधान तुम्हाला घरीच मिळेल.

अशी होईल हजारोंची बचत (This will Save Thousands Rupees)

लॅपटॉप बॅटरी विषयक समस्या नीट समजून न घेताच आपण नवीन बॅटरी खरेदी करण्याचा निर्णय घेतो. या नवीन बॅटरीची किंमत काही हजारांमध्ये असते. मात्र बॅटरीची समस्या अनेक प्रकारे घरीच सोडवता येते. या उपायांबद्दल आपल्याला योग्य महिती असेल तर आपण या पैशांची बचत करू शकतो.

या गोष्टी करा

  • लॅपटॉप चार्जर भिंतीवरील सॉकेट आणि तुमच्या लॅपटॉप प्लगशी योग्यरित्या जोडलेले आहे की नाही याची खात्री करा. अनेकद पिन नीट प्लग-इन करायला आपण विसरतो आणि त्यामुळे लॅपटॉपची बॅटरी चार्ज होत नाही.
  • लॅपटॉप चार्जर दुसर्‍या सॉकेटमध्ये प्लग करण्याचा प्रयत्न करा. यामुळे सॉकेटमध्ये समस्या आहे की नाही हे समजेल. यानंतर, प्रथम चार्जरची केबल दाबलेली किंवा तुटलेली नाही ना? ते तपासणे गरजेचे आहे.
  • लॅपटॉपमधील कुलिंग फॅन तपासा. तुम्हाला त्याचा रंग उडालेला दिसतो का? त्याचा वास घ्या आणि पहा. तुम्हाला जळण्याचा वास येत नाही ना? यावेळी प्लास्टिक जळण्याचा वास येत असेल तर लॅपटॉपचे पॉवर कनेक्टर बदलणे आवश्यक आहे. 
  • लॅपटॉपमध्ये कोणतीही अडचण आढळून आल्यास लगेच कस्टमर केअरशी संपर्क साधा आणि लॅपटॉप वॉरंटी अंतर्गत आहे का ते चेक करा? वॉरंटी अंतर्गत असल्यास, तुम्हाला नवीन चार्जर किंवा पॉवर कनेक्टर नियमानुसार विनामूल्य मिळेल.

वरील सर्व उपाय केल्यानंतरही तुमचा लॅपटॉप चार्ज होत नसेल तर यावेळी पॉवर कनेक्टर तपासा. लॅपटॉपच्या चार्जिंग डॉकमध्ये धूळ असल्यास किंवा काहीतरी अडकले असल्यास ते स्वच्छ करा तसेच, यानंतरही ही समस्या कायम असल्यास सॉफ्टवेअरची तपासून पाहा. यासाठी तुम्हाला तांत्रिक मदत गरजेची असते. तुम्ही जवळच्या दुरूस्ती केंद्रात जाऊन तुमच्या अडचणीवर समाधान मिळवू शकता.