Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Funds: पुरुषांनी नॉमिनी म्हणून घरातील महिलांची निवड का करायला हवी? याचे फायदे काय?

Mutual Fund

Image Source : https://www.freepik.com/

कोणतीही गुंतवणूक केल्यास त्यासाठी नॉमिनी म्हणून घरातील महिलांची निवड करणे कधीही योग्य ठरते. नॉमिनी म्हणून महिलांंची निवड केल्यास काय फायदा होऊ शकतो, जाणून घेऊयात.

कोणतीही गुंतवणूक करताना नॉमिनीची (नामनिर्देशित व्यक्ती) निवड करावी लागते. अगदी बँकेत एफडी करण्यापासून ते म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापर्यंत, सर्वच ठिकाणी नॉमिनी म्हणून विशिष्ट व्यक्तीचे नाव सुचवणे गरजेचे असते. 

अनेकदा पाहायला मिळते की नॉमिनी म्हणून घरातील मुलांची निवड केली जाते. नॉमिनी म्हणून मुलांची निवड करणे नक्कीच चांगले आहे. मात्र, पती अथवा मुलीची निवड करणे अधिक फायद्याचे ठरते. सध्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अशात नॉमिनी म्हणून घरातील महिलांची निवड करायला हवी.

नॉमिनी म्हणजे काय?

सर्वातआधी नॉमिनी म्हणजे काय ते समजून घेणे गरजेचे आहे. नॉमिनेशन म्हणजे एकप्रकारे उत्तराधिकाऱ्याची नेमणूक करणे होय. गुंतवणुकीनंतर मालकाचा मृत्यू झाल्यास अशावेळी संपत्ती कोणाला मिळणार असा प्रश्न निर्माण होतो. 

नॉमिनीची निवड केलेली नसल्यास संपत्तीच्या हक्कासाठी मोठ्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागते. त्यामुळे नॉमिनीची निवड केलेली असल्यास पैसे अथवा संपत्ती त्या व्यक्तीला मिळते. म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी देखील हा नियम लागू होतो. म्युच्युअल फंडसाठी जास्तीत जास्त 3 जणांची नॉमिनी म्हणून निवड करता येते.

महिलांची नॉमिनी म्हणून निवड करण्याचे फायदे

आर्थिक सुरक्षापुरुष म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी घरातील महिला जसे की पत्नी अथवा मुलीची निवड करून त्यांच्या आर्थिक सुरक्षेची काळजी घेऊ शकतात. गुंतवणूकदाराचे निधन झाल्यास अशा स्थितीमध्ये पैसे थेट नॉमिनीला मिळतात. जर कुटुंबातील इतर सदस्य गुंतवणुकदाराच्या उत्पन्नावरच अवलंबून असतील तर अशा स्थितीमध्ये मोठी आर्थिक मदत होते.
संपत्तीचे हस्तांतरणनॉमिनीची निवड करून संपत्ती अथवा गुंतवणुकीची भविष्यातील हस्तांतरण प्रक्रिया देखील सोपी होते. भविष्यात कोणत्याही कारणामुळे संपत्तीचे हस्तांतरण करण्याची वेळ आल्यास त्यावरील सर्वात पहिला हक्क हा नॉमिनीचा असतो. अशाप्रकारे, महिला नॉमिनी असल्यास गुंतवणूक त्यांची होते. 
कुटुंबाचे हितसंपत्ती व मालमत्तेच्या वितरणाबाबत कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होताना पाहायला मिळतात. अशावेळी घरातील महिलांची नॉमिनी म्हणून निवड करून कुटुंबाच्या हिताचे रक्षण करू शकता. नॉमिनीमुळे म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर थेट त्यांचा हक्क आहे, हे स्पष्ट होते.   
कायदेशीर प्रक्रियागुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनी हा संपत्तीचा उत्तराधिकारी असतो. जर आधीच नॉमिनीची निवड केलेली असल्यास गुंतवणुकीच्या मालकीवरून कोणतेही वाद निर्माण होत नाही. परंतु, नॉमिनीचा उल्लेख नसल्यास पैसे मिळताना मोठी समस्या निर्माण होते. मोठ्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागते. नॉमिनीची निवड करून तुम्ही किचकट प्रक्रिया टाळू शकता.

थोडक्यात, विमा पॉलिसी घेण्यापासून ते म्युच्युअल फंडपर्यंत, प्रत्येक गुंतवणुकीसाठी नॉमिनीची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांना भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.