Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Annual plan of Twitter Blue: जाणून घ्या, ट्विटर ब्लू चा वार्षिक प्लॅन काय आहे? मस्क यांनी केला जाहीर

Annual plan of Twitter Blue: जाणून घ्या, ट्विटर ब्लू चा वार्षिक प्लॅन काय आहे? मस्क यांनी केला जाहीर

Elon Musk: इलाॅन मस्क यांच्या ट्विटर ब्लू ची चर्चा ही कित्येक दिवसांपासून रंगत आहे. त्यासाठी लागणारा पैसा किती व काय असेल यांची तर नेहमीच चर्चा होते. नुकतेच मस्क यांनी ट्विटर ब्लूचा वार्षिक प्लॅन जाहीर केला आहे. तो कसा व काय प्लॅन आहे हे, जाणून घेवुयात.

Elon Musk Latest News: मस्क यांनी नुकताच ट्विटर ब्लू सबस्क्रिपशनसाठी नवीन प्लॅन जाहीर केला आहे. विशेष म्हणजे हा प्लॅन मासिक योजनेच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरणार आहे. तसेच आपल्या ट्विटरवर ब्लू टिकमार्क (Blue tick mark) येण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. कारण पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच हा ब्लू टिकमार मिळणार आहे. चला, तर पाहूयात काय आहे, हा इलाॅन मस्क (Elon Musk) यांचा वार्षिक प्लॅन.

वार्षिक प्लॅन काय आहे (What is the Annual plan)

मस्क यांचा ट्विटरचा वार्षिक प्लॅन तुम्हाला 84 डाॅलरमध्ये खरेदी करता येणार आहे. मात्र मासिक योजनेची किंमत ही 8 डाॅलर आहे. जर तुम्ही वार्षिक प्लॅन खरेदी केला तर तुमची बचत ही 22 डाॅलर होणार आहे. तसेच आयोएसवर ही वार्षिक योजना उपलब्ध नसणार आहे. या योजनेमध्ये कॅनडा, आस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, जपान, न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे.

ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनमध्ये काय सुविधा आहे (What are the features of Twitter Blue subscription)

• सबस्क्रिप्शनमध्ये युझर्सला ट्विट लिहिता येणार आहे
• 1080 पिक्सेलमध्ये व्हिडिओ अपलोड करण्याची संधी
• एचडी, रीडर मोड आणि ब्लू टीकमार्क मिळेल
• ब्लू टीकमार्कने नंबरची पडताळणी होईल
• याशिवाय रिप्लाय, क्रेडिट आणि सर्च याला प्राधान्य मिळेल
• सामान्य युजर्सपेक्षा 50% कमी जाहिराती दिसतील
•  नवीन फीचर्ससाठी ब्लू टिकमार्क प्राप्त युजर्सला प्राधान्य दिले जाणार

ब्लू टिकमार्क तात्पुरता काढला जाणार (The Blue Tickmark will be temporarily removed)

वार्षिक प्लॅननुसार, तुम्ही तुमच्या अकाउंटवर हँडल, डिस्प्ले नाव किंवा प्रोफाईल फोटो बदलण्यास सक्षम असणार आहे. जर तुम्ही प्रोफाईल फोटो बदलल्यास, तुमच्या खात्याचे व्हेरिफिकेशन होईपर्यंत तुमच्या ब्लू टिकमार्क तात्पुरता काढला जाईल. ट्विटरने असेही सांगितले आहे. बिझनेस करणाऱ्यांसाठी अधिकृत लेबल सोन्याच्या टिकमार्कने असेल, तर सरकारी आणि बहुपक्षीय प्रोफाईलवर राखाडी रंगाचे टिकमार्क पाहायला मिळेल.