Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan against Securities म्हणजे काय? शेअर्स, विम्यावर कसे मिळेल कर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Loan against Securities

Image Source : https://www.freepik.com/

पैशांची गरज असल्यास सिक्युरिटीज तारण ठेऊन कर्ज काढणे फायद्याचे ठरते. तुम्ही शेअर्स, पॉलिसी, म्युच्युअल फंड तारण ठेऊन सहज कर्ज काढू शकता.

सर्वसाधारणपणे घर अथवा सोने तारण ठेऊन कर्ज काढले जाते. मात्र, अनेकदा या आधारावर कर्ज मिळत नाही. तुम्ही देखील आर्थिक अडचणीमुळे कर्ज काढण्याचा विचार करत सिक्युरिटीजवर कर्ज (Loan Against Securities) काढू शकता. तुम्ही जर याआधी शेअर्स, पॉलिसी, म्युच्युअल फंड सारख्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केलेली असल्यास, यावर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. विशेष म्हणजे पारंपारिक कर्जाच्या तुलनेत सिक्युरिटीजवर कर्ज काढणे खूपच सोपे आहे. 

लोन अगेंस्ट सिक्योरिटीज (Loan Against Securities) म्हणजे काय?

Loan Against Securities हे एकप्रकारे वैयक्तिक कर्जासारखे आहे. जसे तुम्ही सोने अथवा घर तारण ठेऊन कर्ज काढता, अगदी त्याचप्रमाणे विमा पॉलिसी, स्टॉक्स, म्युच्युअल फंड, बाँड्स तारण ठेऊन कर्ज काढू शकता. विशेष म्हणजे कर्जाच्या स्वरुपात जेवढी रक्कम वापरला, त्यावरच व्याज द्यावे लागेल.

या सिक्योरिटीजवर मिळेल कर्ज

  • डीमॅट शेअर्स
  • जीवन विमा पॉलिसी
  • म्युच्युअल फंड
  • स्टॉक्स
  • नाबार्ड बाँड्स
  • फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स
  • एक्सचेंज ट्रेडेड फंड
  • किसान विकास प्रमाणपत्र
  • नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

लोन अगेंस्ट सिक्योरिटीज कसे काम करते?

लोन अगेंस्ट सिक्योरिटीज हे एकप्रकारे ओव्हरड्राफ्टप्रमाणे काम करते. तुम्ही तारण ठेवलेल्या सिक्योरिटीजच्या आधारावर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट स्वरुपात कर्ज दिले जाते. तुम्ही हे पैसे बँक खात्यातून काढू शकता. तसेच, जेवढी रक्कम तुम्ही वापराल त्यावरच व्याज द्यावे लागेल. समजा, तुम्ही 1 लाख रुपये किंमतीचे शेअर्स तारण ठेऊन बँकेकडून कर्ज घेतले आहे. तुम्हाला बँकेकडून 70 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळाले आहे व 1 महिन्याच्या कालावधीत तुम्ही केवळ 50 हजार रुपयेच खर्च केले. अशा स्थितीमध्ये तुम्हाला केवळ 50 हजार रुपयांवरच व्याज द्यावे लागेल. अनेक बँका नेटबँकिंगच्या माध्यमातून देखील असे कर्ज उपलब्ध करतात. 

पारंपारिक कर्ज vs Loan Against Securities

कर्जाची प्रक्रियापारंपारिक कर्जाची प्रक्रिया फारच किचकट व वेळखाऊ असते. त्या तुलनेत तुम्ही सिक्युरिटीज तारण ठेऊन तुम्ही अवघ्या काही दिवसात कर्ज काढू शकता. यामुळे वेळेची तर बचत होईलच, सोबतच अडचणीच्या काळात त्वरित पैसे मिळतील.
कर्जाची रक्क्मनियमित कर्जामध्ये किती रक्कम दिली जाईल हे कर्जदाराच्या आर्थिक स्थिती व आधीच्या व्यवहारावर ठरत असते. तर Loan Against Securities मध्ये बाजार मुल्यानुसार कर्जाची रक्कम ठरते. सर्वसाधारणपणे सिक्योरिटीजच्या मुल्याच्या 80 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते.
रिपेमेंटनियमित कर्जावर ईएमआय व व्याजदर भरण्याचा कालावधी हा निश्चित केलेला असतो. सर्वसाधारणपणे यात बदल होत नाही. तर त्या तुलनेत Loan Against Securities मध्ये तुम्ही कधीही पैसे परत करू शकता. कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता कर्जाची परतफेड करता येते.
कमी व्याजदरनियमित कर्जाच्या तुलनेत सिक्योरिटीज तारण ठेऊन काढलेल्या कर्जावर कमी व्याजदर आकारले जाते. सर्वसाधारणपणे बँका सिक्योरिटीजच्या कर्जावर 9 ते 12 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारतात. मात्र, याचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही जेवढी रक्कम वापराल त्यावरच व्याजदर आकारले जाते. प्रोसेसिंग शुल्क देखील खूपच कमी असते.