Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI New Features: जाणून घ्या युपीआयचे येत्या काळातील नवीन फीचर्स!

UPI New Features

UPI New Features: . नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (National Payments Corporation of India - NPCI) आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये 11,90,593.39 कोटी रुपयांचे व्यवहार युपीआयमार्फत झाले आहेत. नागरिकांकडून होत असलेल्या युपीआयच्या स्वागताचे हे उत्तम उदाहरण आहे.

भारतात डिजिटल पेमेंटद्वारे व्यवहार करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज भीम अ‍ॅप, गुगल पे, फोन पे यासारख्या पेमेंट अ‍ॅपचा (BHIM App, Google Pay, PhonePe Payment App) वापर केला जात आहे. अगदी भाजीविक्रेत्यापासून ते मॉलमधील मोठमोठ्या ब्रॅण्डसद्वारे युपीआयचा वापर केला जात आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (National Payments Corporation of India - NPCI) आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये 11,90,593.39 कोटी रुपयांचे व्यवहार युपीआयमार्फत झाले आहेत. नागरिकांकडून होत असलेल्या युपीआयच्या स्वीकृतीचे द्योतक आहे. 

इतक्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या युपीआयचा वाढता वापर लक्षात घेऊन 3 महिन्यांपूर्वी ग्लोबल फिनटेक (Global Fintech) महोत्सवात युपीआयद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत साधाक-बाधक चर्चा करण्यात आली होती. या चर्चेत युपीआयद्वारे ग्राहकांना आणखी काही नवीन फीचर्स आणले आहेत. चला मग जाणून घेऊयात काय आहेत हे नवीन फीचर्स!

युपीआय 123 (UPI 123)

भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये अजूनही 30 ते 35 कोटी भारतीयांना स्मार्टफोन वापरणे परवडत नाही. अशा ग्राहकांसाठी युपीआयने फीचर्स फोनसाठी युपीआय 123 ही सुविधा आणली आहे. या सुविधेद्वारे फीचर्स फोन ग्राहकांना बॅंकेचे व्यवहार ऑनलाईन करता येणार आहे.

युपीआय ऑटो पे (UPI Auto Pay)

युपीआय ऑटो पे या सुविधाचा वापर कर्जाचा ईएमआय, वीज बिल, मोबाईल बिले आणि इतर प्रकारची बिले भरण्यासाठी केला जातो. या सुविधेद्वारे ऑटोमटेड बिलिंग केले जाते. म्हणजे तुम्ही जरी बिल भरण्यास विसरला  तरी ऑटो पे मात्र त्याला दिलेल्या सूचनेनुसार त्या दिवशी बिल भरणारच. अर्थात बिल भरण्यासाठी त्याला जोडलेल्या खात्यात तेवढे पैसे ठेवणे गरजेचे आहे. पूर्वी या सुविधेसाठी फक्त 5 रुपयांपर्यंत मर्यादा होती. आता ती वाढवून 15 हजार रुपये करण्यात आली.

युपीआय लाईट (UPI Lite)

युपीआय लाईट ही सुविधा सध्या भीम अ‍ॅपवर उपलब्ध आहे. त्याचबरोबरीने आता कोटक महिंद्रा बॅंक, एसबीआय, पीएनबी, युनियन बॅंक, इंडियन बॅंक, एचडीएफसी बॅंक, कॅनरा बॅंक या बॅंकाही सुविधा देऊ लागल्या आहेत. युपीआय लाईटचा वापर करण्यासाठी याच्या वॉलेटमध्ये किमान रक्कम भरावी लागते. या वॉलेटमधून तुम्हाला पैसे खर्च करता येतात. याचे व्यवहार झाले की, त्याची माहिती तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर मिळते.

रुपे क्रेडिट कार्ड आणि युपीआय (Rupay Credit Card & UPI)

सध्याच्या प्रक्रियेनुसार युपीआयद्वारे व्यवहार केले की, लगेच तुमच्या बॅंकेतून पैसे कट होतात. त्यामुळे काही ग्राहकांना डिजिटली क्रेडिट कार्डच्या लिमिटचा वापर करता येत नाही. यासाठी युपीआयने रुपे क्रेडिट कार्डशी टायअप करून QR Code स्कॅन करून व्यवहार पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेत तुमच्या बॅंकेतील पैसे कट होत नाहीत तर ते रुप क्रेडिट कार्डमधून वापरले जातात.

भारत बिल क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टीम (Bharat Bill Cross Border Payment System)

भारत बिल क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टीमचा वापर करून तुम्ही परदेशात राहून देखील भारतात व्यवहार करू शकता. जसे की, तुम्ही परदेशात राहत आहात आणि तुमचे आईवडिल किंवा नातेवाईक भारतात राहत आहेत. तर त्यांची वेगवेगळी प्रकारची बिले, हप्ते तुम्ही भारत बिल क्रॉस सिस्टिमद्वारे सहज भरू शकता. अशाप्रकारे भारतातील प्रत्येक ग्राहक युपीआयचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून त्याचा लाभ घेऊ शकतो. यामुळे वेळ आणि पैसे अशी दोन्हींची बचत होण्यास मदत होते.

भारतात वापरल्या जाणाऱ्या UPI अ‍ॅपची संख्या!

भारतात वेगवेगळ्या बॅंका, नॉन-बॅंकिंग संस्था आणि अ‍ॅमेझॉन पे, गुगल पे, फोन पे यासारख्या आणखी काही इतर माध्यामातून एकूण 67 प्रकारे युपीआयच्या व्यवहारांसाठी अ‍ॅपचा वापर केला जातो. एनपीसीआयच्या नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार, यासर्वांमध्ये फोन पे, गुगल पे आणि पेटीएम या 3 अ‍ॅपचा क्रमांक लागतो.

क्र.

अ‍ॅपचे नाव

एकूण व्यवहार

व्हॉल्युमू (मिलिअनमध्ये)

व्हॅल्यू (कोटीत)

1

PhonePe

3,418.75

591,327.61

2

Google Pay

2,541.14

409,714.75

3

Paytm Payments Bank App

1,081.47

128,805.91

4

Cred

25.63

18,599.72

5

Yes Bank Apps

43.58

14,902.42

6

ICICI Bank Apps

44.07

14,750.80

7

BHIM

25.01

8,144.83

8

Amazon Pay

59.76

5,873.36

9

HDFC Bank Apps

10.66

2,758.45

10

Kotak Mahindra Bank Apps

10.93

2,304.90

Ref: https://www.npci.org.in/what-we-do/upi/upi-ecosystem-statistics