Finance Minister Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. यामध्ये लातूरकरांचे इतक्या वर्षाचे स्वप्न पूर्ण झाल्याने लातूरकरांना एक सुखद धक्का बसला आहे.
लातूरमध्ये वंदे भारत ट्रेनची निर्मिती (Vande Bharat Train will be Manufactured in Latur)
अर्थसंकल्पमध्ये रेल्वेमध्ये सर्वाधिक जास्त तरतूद करण्यात आली. साधारण 2 लाख 40 हजार कोटींची घोषणा या क्षेत्रासाठी करण्यात आली आहे. 2023 मध्ये वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस या ट्रेनची निर्मिती जलद करण्याच्या हेतूने त्याचे काम लातूर, सोनीपथ व रायबरेली या तीन ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे लातूरकरांचे वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे दिसत आहे.
हायड्रोजन गॅसवर ट्रेन धावणार (The Train will Run on Hydrogen Gas)
हायड्रोजन गॅसवर चालणारी ट्रेन ही फक्त चीन व जर्मनी या देशात आहे. जर्मनीमध्ये 2018 पासून या हायड्रोजन ट्रेनची चाचणी सूरू आहे. या दोन्ही देशानंतर हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनमध्ये भारताचा समावेश होणार आहे. भारतात ही हायड्रोजन गॅसवर चालणारी ट्रेन देशाच्या विविध आठ मार्गांवर धावणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे काम जोरात (Bullet Train Work in Maharashtra is Fast)
महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या कामाची गती वाढविण्यात आली आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद धावणार आहे. या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे काम गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठीदेखील अर्थसंकल्पात एक मोठा निधी देण्यात आला असल्याचे, रेल्वेमंत्र्यानी सांगितले आहे.