Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Good News about Bonus: जाणून घ्या, 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला 50 महिन्यांचा पगार बोनस

Good News about Bonus

Good News: जर तुम्हाला वर्षाच्या सुरूवातीलाच 50 महिन्यांचा पगार हा बोनस म्हणून मिळाला तर तुमच्या आनंदाला पारावर उरणार नाही. मात्र ही मोठी आनंदाची बातमी आपल्याकडे नाही, तर तायवानच्या एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. ती का दिली, कोणती कंपनी आहे याविषयी सविस्तर जाणून घेवुयात.

Good News: नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच तुम्हाला जर मोठी रक्कम बोनस म्हणून मिळाली तर तुमचा आनंद गगनात मावेनासा होईल ना, हो..ना...पण हे सत्य आहे. एक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चक्क 50 महिन्यांचा पगार बोनस म्हणून देण्यात आला आहे, ती कोणती कंपनी, कुठे याविषयी सविस्तर जाणून घेवुयात.

कोणती कंपनी? (Which Company)

तायवान (Taiwan) देशातील एव्हरग्रीन मरीन कॉर्पोरेशन (Evergreen Marine Corporation)नावाची ही कंपनी आहे. या कंपनीने चक्क आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल 50 महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिला आहे. हे अगदी सत्य आहे. या कंपनीने आपल्या काही निवडक कर्मचाऱ्यांना चार वर्षांचा पगार बोनस म्हणून दिला आहे. या कंपनीने स्टेलर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेलर बोनस म्हणजे कंपनीला चांगला परफाॅर्मेन्स दिल्यामुळे हा पगार एक कौतुकास्पद म्हणून दिला जातो. त्यामुळे कर्मचारी एकदम आनंदी असतील, याच शंका नाही.

का देण्यात आला बोनस? (Why was the Bonus Given)

एव्हरग्रीन मरीन कॉर्पोरेशन या कंपनीने हा बोनस देण्यामागचे कारण म्हणजे 2022 मध्ये या कंपनीने चांगला व्यवसाय केला असून मागील वर्षी मोठा फायदा झाला असल्याचे सांगितले जाते. या कंपनीतील कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचा पगार हा बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा स्टेलर बोनस असून तो फक्त त्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, जे सध्या तायवानमध्ये काम करतात. हा बोनस त्यांना त्यांच्या जॉब ग्रेड आणि कामाच्या आधारावर देण्यत येणार आहे.

कसे कळाले? (How did you Know)

एव्हरग्रीन मरीन कॉर्पोरेशन कंपनीने या बोनसबाबत जास्त काहीही सांगितलेले नाही. शुक्रवारी कंपनीने एक स्टेटमेंट जारी केले असून, त्यामध्ये त्यांनी सांगितले की वर्षाच्या अखेरला मिळणारा बोनस हा कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक कार्य आणि कंपनीला त्याचा काय फायदा झाला या आधारे देण्यात आला असल्याचे  स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आले आहे.

कंपनीला किती फायदा झाला (How much did the Company Benefit)

ही कंपनी शिपिंग व्यवसायाशी संबंधित आहे. मागील वर्षी मालभाड्याच्या किंमतीत वाढ झाली होती व ग्राहकांचीदेखील तशी मागणी वाढली होती. त्यामुळे या कंपनीचा मोठा फायदा झाला आहे. जवळजवळ 1 लाख 70 हजार कोटी या कंपनीला लाभ झाला असल्याने, त्यांनी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा हा निर्णय घेतला आहे.