पैशाची गरज भासते तेव्हा काही वेळा कर्ज घेण्याची गरज निर्माण होते. अशा वेळी घर तारण ठेवण्याच्या पर्यायाचा देखील विचार केला जातो. हा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्या मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.
Table of contents [Show]
आपल्या गरजेसाठी हाच एकमेव पर्याय आहे का?
घरावर तारण कर्ज घेण्याच्या दृष्टीने हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण जेव्हा आपण घर तारण ठेऊन पैसे घेतो. काही कारणाने हे पैसे फेडण्यास आपण असमर्थ ठरलो तर शेवटचा पर्याय म्हणून आपल्या घरावर जप्ती देखील येऊ शकते. यामुळे हा एकमेव पर्याय शिल्लक असल्याशिवाय Home mortgage ठेवण्याचा विचार न करणे आदर्श मानले जाते.
अन्य गुंतवणूक आहे का?
काही वेळा कर्ज की गुंतवणूक मोडणे असा पर्याय समोर आल्यावर गुंतवणूक मोडण्याचा पर्याय देखील अधिक फायदेशीर ठरू शकतो. असा पर्याय उपलब्ध आहे का, याचा देखील विचार करणे आवश्यक आहे. हा पर्याय स्वीकारता आल्यास Home mortgage ठेवण्याचा पर्याय टाळणे शक्य होऊ शकते.
आपत्कालीन निधी तयार करणे आवश्यक
अचानक एखादा आर्थिक प्रश्न समोर उभा राहू शकतो. अशा वेळी कर्जाशिवाय पर्याय राहत नाही. ही परिस्थिति टाळण्यासाठी आपत्कालीन निधी म्हणून काही रक्कम बाजूला काढून ठेवली जाऊ शकते. ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे कर्ज किवा तारण ठेऊन पैसे घेण्याची गरज लागणार नाही.
घर तारण ठेवण्याची प्रक्रिया काय?
स्वत:च्या मालकीच्या घरावर कर्ज घ्यायचा निर्णय झाल्यावर वित्तसंस्थेकडे घराशी संबंधित कागदपत्र सादर करावी लागतात. कागदपत्र व्यवस्थित असल्यास आणि परतफेड केली जाऊ शकते असे वाटल्यास वित्त संस्थेकडून कर्ज मंजूर होऊ शकते. कर्ज मंजूर झाल्यास आणि त्यानंतर कर्जाची परतफेड व्यवस्थित केल्यास घराची कागदपत्रे परत केली जातात. मात्र कर्जफेड होऊ शकली नाही तर नोटिस आणि अंतिमत: घराची जप्ती देखील होऊ शकते.
यामुळे सहज उपलब्ध आहे म्हणून या Home mortgage कर्जाचा विचार केला जात नाही. अगदी काही पर्याय नसेल तेव्हा घर तारण ठेवण्याचा पर्यायाचा सामान्यपणणे विचार केला जातो. याबाबत सर्व परिस्थितीचा सारासार विचार करून निर्णय घेणे योग्य ठरते.