Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vijay Mallya Net worth: जाणून घ्या भारतीय बॅंकांना लुबाडणाऱ्या विजय माल्याची संपत्ती किती?

Vijay Mallya Net Worth

Image Source : www.wikibio.in

Vijay Mallya Net Worth: डिसेंबर, 2022 मध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, विजय माल्याची अंदाजित संपत्ती 1.2 बिलिअन डॉलर इतकी असल्याचे wealthygorilla.com या वेबसाईटने म्हटले आहे.

विजय माल्या हे भारतीय बिझनेसमॅन असून त्यांच्यावर भारतीय बॅंकांमधून 9 हजार कोटी रुपये कर्ज घेऊन पसार झाल्याचा आरोप आहे. विजय माल्या सध्या इंग्लंडमध्ये राहत असून त्यांचा जन्म 18 डिसेंबर, 1955 मध्ये कोलकाता येथे झाला होता. माल्या युनायटेड स्पिरिट (United Spirit) आणि किंगफिशर एअरलाईनचे (Kingfisher Airlines) चेअरमन राहिले आहेत. किंगफिशर एअरलाईन सध्या बंद झाली असून युनायटेड स्पिरिट कंपनी विकली गेली आहे. याशिवाय माल्या सनोफी इंडिया (Sanofi India) आणि बेअर कॉर्प सायन्स (Bayer Crop Science) कंपनीचे चेअरमन राहिले आहेत. काहीवर्षांपूर्वी विजय माल्याला किंग ऑफ गुड टाईम (King of Good Time) म्हटले जात होते. wealthygorilla.com या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, विजय माल्या यांची डिसेंबर, 2022 मध्ये एकूण संपत्ती 1.2 बिलिअन डॉलर इतकी आहे.

विजय माल्या याच्या मालकीच्या असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांनी भारतीय बॅंकांकडून कर्ज घेऊन पसार झाला होता. माल्याने 2 मार्च, 2016 मध्ये भारत सोडून इंग्लंडमध्ये आश्रय घेतला होता. त्याच्यावर सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाने वेगवेगळ्या आरोपांखाली गुन्हे दाखल केले आहेत. 24 एप्रिल, 2016 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने विजय माल्याचा पासपोर्ट रद्द केला. 

Vijay mallya
Image Source: www.celebritynetworth.com

विजय माल्याला पकडण्यासाठी ईडीने इंटरपोलकडे मदत मागितली आहे. भारतातील सुमारे  बॅंकांनी इंग्लंडमधील न्यायालयात विजय माल्याच्या विरोधात 10 हजार कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. तो दावा भारतीय बॅंकांनी जिंकला असून, अजून विजय माल्याला भारतात प्रत्यार्पण करण्याबाबत निर्णय झालेला नाही.

विजय माल्या कोण आहे?

विजय माल्याचा जन्म 18 डिसेंबर, 1955 मध्ये कोलकाता येथे झाला होता. विजय माल्या युनायडेट स्पिरिट आणि किंगफिशर एअरलाईनचे चेअरमन राहिले आहेत.

विजय माल्या सध्या काय करत आहे?

विजय माल्या सध्या ब्रिटनमध्ये राहत आहे; तिथून त्यांना भारतात प्रत्यार्पण करण्याची कायदेशीर लढाई सुरू आहे.

Vijay Mallya in 2022
Image Source: www.bloomberg.com

विजय माल्याने भारत केव्हा सोडला?

विजय माल्याने मार्च, 2016 मध्ये भारत सोडला.

विजय माल्यावर आरोप काय आहेत?

विजय माल्यावर मनी लॉण्ड्रिंग आणि टॅक्स चोरीचे आरोप आहेत. अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate-ED) आणि इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाने विजय माल्याच्या विरोधात केस दाखल केली आहे.

विजय माल्याची सध्याची संपत्ती किती आहे?

डिसेंबर, 2022 मध्ये उपलब्ध असलेल्या माहितीअनुसार, विजय माल्याची अंदाजित संपत्ती 1.2 बिलिअन डॉलर इतकी आहे.

विजय माल्या खासदार होते?

विजय माल्या दोनवेळा राज्यसभेवर खासदार होते. 2002 मध्ये कॉँग्रेस आणि जेडीएसच्या मदतीने तर 2010 मध्ये भाजप आणि जेडीएसच्या मदतीने राज्यसभेवर खासदार म्हणून गेले होते.