मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाचे चित्र असताना दिवाळी नंतरही सोन्या-चांदीच्या बाजारात हालचाल दिसत आहे. भाऊबीजनंतर लगेच दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. सोन्या-चांदीच्या बाजारात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 50 हजार 800 च्या जवळपास आला आहे. बुधवारच्या (दि. 26 ऑक्टोबर) तुलनेत गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 40 रुपयांची वाढ होऊन आज सोनं 50 हजार 791 रुपये झाले. तर 22 कॅरेट सोनं ज्यापासून दागिने घडवले जातात त्याची किंमत 46,525 प्रति 10 ग्रॅम एवढी झाली आहे. तर कालच्या तुलनेत आज 1 किलो चांदीचा भाव 115 रुपयांनी वाढला आहे. India Bullion and Jewellers Association Ltd.- IBJA च्या संकेतस्थळावर आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50 हजार 800 च्या जवळपास आला आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 40 रुपयांची वाढ झाली आहे.
सोन्या- चांदीचे आजचे दर (Gold Silver Price Today)
27 ऑक्टोबरचे दर (रुपये / 10 ग्रॅम) | 26 ऑक्टोबरचे दर (रुपये / 10 ग्रॅम) | दरात बदल (रुपये / 10 ग्रॅम) | |
सोनं ( Gold) 999 24 कॅरेट | 50791 | 50751 | 40 |
सोनं ( Gold) 995 23 कॅरेट | 50588 | 50551 | 37 |
सोनं ( Gold) 916 22 कॅरेट | 46525 | 46488 | 37 |
सोनं ( Gold) 750 18 कॅरेट | 38093 | 38063 | 30 |
सोनं ( Gold) 585 14 कॅरेट | 29713 | 29689 | 24 |
चांदी ( Silver) 999 | 57966 ( रु/ किलो) | 57851 ( रु/ किलो) | 115 ( रु/ किलो) |
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त खरेदी!
पुण्यातील ज्वेलर्स असोसिएशनचे प्रमुख योगेश सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दिवाळीत सोन्या-चांदीची खरेदी तेजीत झाली. यावर्षी ज्वेलर्सने ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स दिल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. तर ओरिगो ई मंडीचे असिस्टंट जनरल मॅनेजर (कमोडिटी रिसर्च) तरुण तत्संगी यांच्या सांगण्यानुसार मागील काही महिन्यांपासून सोनं 49,000 ते 51,000 च्या मर्यादेत उलाढाल करत आहे.