Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Date of Birth Update : आधार कार्डवरील जन्मतारीख बदलायची आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Date of Birth Update in Aadhar

Aadhaar Card Update : भारत सरकारच्या UIDAI या यंत्रणेमार्फत सर्वसामान्यांना आधार कार्ड ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अपडेट करता येते. आधार कार्डमध्ये बदल कसे करायचे? आणि आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी काय करावे लागेल? हे जाणून घेऊ.

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे अपडेट करू शकता. अनेकांची जन्मतारीख वेगवेगळ्या कारणांमुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिसून येते. (उदाहरणार्थ, शाळेत, जन्म दाखल्यावर किंवा कामाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नोंद झाल्यामुळे) त्यामुळे ती आधारकार्डवरसुद्धा चुकीची लिहिली जाते. आधार कार्ड सध्या हा खूप महत्त्वाचा पुरावा मानला जातो. अनेक ठिकाणी ओळखपत्र (I-Card) म्हणून आधार कार्ड घेतले जाते. त्याच आधार कार्डवरील तुमची चुकीची जन्मतारीख अपडेट कशी करायची. याबाबत या लेखात आपण जाणून घेणार आहोत. (Update Date of Birth on Aadhaar Card)

आधार कार्डमध्ये कोणती माहिती ऑनलाईन बदलता येते?

आधार ऑनलाईन अपडेट करताना, आधार कार्डमधील सर्व माहिती अपडेट किंवा दुरुस्त करता येते. या अगोदर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये फक्त पत्ता अपडेट करता येत होता. जर एखाद्या व्यक्तीला अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, लिंग किंवा इतर माहिती अपडेट करायची असेल, तर त्याला आधार केंद्राला भेट द्यावी लागत होती. पण आता आधारने नवीन प्रक्रियेद्वारे या सुविधा ऑनलाईन सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत. 


माय आधार (https://myaadhaar.uidai.gov.in/) या वेबसाईटद्वारे तुम्ही नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता यामध्ये ऑनलाईन बदल करू शकता. जी माहिती तुम्हाला बदल करायची आहे. त्याचा पुरावा तुम्हाला ऑनलाईन अपडेट करावा लागतो. जर तुम्हाला तुमची जन्मतारीख बदलायची आहे. तर तुम्ही या माय आधार वेबपार्टलवर तुमचा आधार क्रमांक टाकून लॉगिन करू शकता. तिथे Date of Birth वर क्लिक करा. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची योग्य माहिती भरू शकता. त्याचा योग्य पुरावा अपलोड करून तो व्हेरिफाय करा. त्यानंतर तुम्हाला नवीन कार्डसाठी 50 रुपये ऑनलाईन पेमेंट करावे लागेल. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला acknowledgement स्लिप मिळेल. ती आधार कार्डचे स्टेटस जाणून घेण्यासाठी जपून ठेवा.

Aadhar Card Update Info Online

आधार कार्डमध्ये जन्मतारीख (Date of Birth) कशी बदलायची? 

1. तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या.
2. आधार अपडेट फॉर्म योग्यरित्या भरा आणि त्यावर तुमची जन्मतारीख टाका. 
3. तुम्हाला कार्डमध्ये छापल्याप्रमाणे जन्मतारीख लिहण्याची आवश्यकता नाही. जी तुमची योग्य जन्मतारीख आहे तीच टाका. 
4. तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा फॉर्मसह जोडून तो संबंधित केंद्रावरील अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल.
5. तुमची ओळख पटवून घेण्यासाठी आधार केंद्रावर तुमचे बायोमेट्रिक्स पडताळले जातील. 
6. त्यानंतर केंद्रावरील अधिकाऱ्याकडून एक पोचपावती आणि URN क्रमांक दिला जाईल.
7. अपडेट स्थितीचा मागोवा घेण्यासाठी तुम्ही URN क्रमांकाचा वापर करू शकता.
8.  या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुम्हाला 25 रुपये फी भरावी लागेल.

जन्मतारीख (DOB) अपडेट करण्यासाठी लागणारे कागदपत्रे

1. जन्म प्रमाणपत्र
2. अर्जदाराचे फोटो असलेले ओळखपत्र
3. तहसीलदाराने त्यांच्या लेटरहेडवर दिलेले जन्मतारीख प्रमाणपत्र

आधार कार्डमध्ये तुम्ही तुमचा पत्ता ऑनलाईन अपडेट करू शकता. आधार सेल्फ सर्विस अपडेट या पोर्टलला भेट देऊन तुम्ही तुमचा पत्ता अपडेट करू शकता. त्यामध्ये पत्त्याचा अधिकृत पुरावा जोडल्यानंतर काही दिवसांत आधारकार्डवरील पत्ता अपडेट होतो. अपडेट केलेल्या आधार कार्डची प्रिंटसुद्धा तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे मिळवू शकता. (Online process of updating Aadhaar card)

आधार कार्ड अपडेट करताना घ्यावयाची काळजी, 

1. आधार कार्ड अपडेट करताना दिलेले सर्व कागदपत्रे अधिकृत असावे. 
2. आवश्यक माहिती इंग्रजी आणि मराठी भाषेत लिहावी. 
3. सर्व आवश्यक माहिती भरायला पाहिजे आणि कोणताही पर्याय रिकामा ठेवू नका. 
4. अर्जदाराचे नाव लिहिताना कोणतेही पद व विशेषण वापरू नका. 
5. पुरावा म्हणून आवश्यक असलेली कागदपत्रे फॉर्मसोबत जोडावीत.