Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जाणून घ्या इतिहास क्रिप्टोकरन्सीचा!

crypto

डेविड चौम (David Chaum ) यांचे डिजिकॅश (DigiCash) आणि निक सझबो (Nick Szabo) यांचे बिटगोल्ड (Bitgold) या दोन्हीच्या संकल्पना एकत्र केल्या तर ते आताच्या बिटकॉईन (Bitcoin) या प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सीसारखे चलन तयार होईल.

क्रिप्टोकरन्सीची कल्पना 1980 मध्ये उदयास आली. कल्पना अशी होती की, एक असं चलन तयार करण्यात यावं. जे अनाकलनीयपणे व्यवहारात वापरणे शक्य झालं पाहिजे. या चलनाच्या व्यवहारात केंद्रीकृत संस्थानाचा (Centralised Mechanism) समावेश नसावा. हे क्रिप्टोकरन्सीचं (Cryptocurrency) मुख्य उद्दिष्ट म्हणता येईल.

अमेरिकन क्रिप्टोग्राफर डेविड चौम (David Chaum) याने 1995 मध्ये डिजिकॅश (DigiCash) नावाचे निनावी क्रिप्टोग्राफिक विदुत चलन (Cryptographic Electronic Money) तयार केले होते. याला क्रिप्टोकरन्सीचे अगदी सुरुवातीचे रूप म्हणता येईल. अशाप्रकारच्या क्रिप्टोग्राफिक इलेक्ट्रॉनिक चलनाच्या व्यवहारासाठी वापरकर्त्यांना सॉफ्टवेअर वापरावे लागायचे. ज्याद्वारे ते बँकांमधून पैसे काढू शकत होते. तसेच हे क्रिप्टोग्राफिक इलेक्ट्रॉनिक चलन पाठवण्यासाठी विशिष्ट एनक्रिप्टेड की (Specific Encrypted Keys)ची गरज पडत असे.


1998 मध्ये निक सझबो (Nick Szabo) यांनी आताच्या बिटकॉईनप्रमाणेच बिटगोल्ड (Bitgold) तयार केले होते. बिटगोल्डमध्ये क्रिप्टोग्राफिक कोडी सोडवावी लागत. ही कोडी सोडविणाऱ्यांना बक्षीस दिले जायचे. डेविड चौम (David Chaum ) यांचे डिजिकॅश आणि निक सझबो (Nick Szabo) यांचे बिटगोल्ड या दोन्हीच्या संकल्पना एकत्र केल्या तर ते आताच्या बिटकॉईन (Bitcoin) या प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सीसारखे चलन तयार होईल. पण सझबो केंद्रीय प्राधिकरणाच्या (Central Authority) वापराशिवाय डबल-स्पेंडिंग प्रॉब्लेम (Double-spending problem) असणारे कोडे सोडवू शकत नव्हते. डबल-स्पेंडिंग प्रॉब्लेममध्ये ब्लॉकचैन हॅक करून कॉईन्सच्या व्यवहाराची माहिती मिळवता येते. ज्यामुळे वापरलेल्या कॉईन्सवर पुन्हा मालकी मिळवता येते. या समस्येवर योग्य असा पर्याय न सापडल्यामुळे क्रिप्टोकरन्सीचा प्रवास इथेच थांबला होता.

एका दशकानंतर एका रहस्यमय व्यक्तीने सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) ह्या टोपणनावाचा वापर करून डबल-स्पेंडिंग प्रॉब्लेमवरील उत्तर शोधून काढले. त्याने बिटकॉईन नावाने व्हाईट पेपर (White Paper) प्रसिद्ध केला. व्हाईट पेपर हा एक प्रकारचा असा दस्तऐवज आहे. ज्याद्वारे संशोधक त्यांच्या प्रकल्पाची माहिती प्रसिद्ध करतात. 31 ऑक्टोबर, 2008 मध्ये सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉईनचे व्हाईट पेपर प्रसिद्ध केले. या पीअर टू पीअर इलेक्ट्रॉनिक कॅश सिस्टममध्ये बिटकॉईन ब्लॉकचैन नेटवर्कचे कामकाज व कार्यपद्धतीचा समावेश होता. 

18 ऑगस्ट, 2008 मध्ये Bitcoin.org हे डोमेन विकत घेतल्यानंतर सातोशी यांनी बिटकॉईनवर काम करणे सुरु केले. त्यांनी 3 जानेवारी 2009 मध्ये बिटकॉईनच्या पहिल्या ब्लॉकची निर्मिती केली. अशाप्रकारे बिटकॉईनच्या यशस्वी निर्मितीनंतर क्रिप्टोकरन्सीवर पुन्हा प्रकाश पडायला सुरुवात झाली. ज्या बिटकॉईनची सुरुवात फक्त 14 सेन्ट्स (Cents), भारतीय चलनात सांगायचे झाले तर 0.049511 रूपये इतकी होती. ती आज 28 हजार डॉलर्स, म्हणजेच 21,88,023 रूपये आहे. यावरून भविष्यातील अर्थव्यवस्थेत होणाऱ्या बदलांचा एक अंदाज येऊ शकतो.