Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Richest Pets in the World: जाणून घ्या, कुत्र्याने मालकाला कमवून दिले तब्बल 4 हजार 32 कोटी

Richest Pets in the World

Image Source : http://krishijagran.com/

Richest Pets in the World: आजतागायत आपल्याला सर्वाधिक श्रीमंत उद्योपती व सेलेब्रिटिज यांनी करोडो रूपये कमविले असल्याची माहिती होती. पण तुम्ही कधी एखादया कुत्र्याने एखाद्या व्यक्तीला म्हणजेच त्याच्या मालकाला करोडो रूपये कमवून दिले, हे ऐकले का? चला, तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

Richest Pets in the World: जगात श्वानप्रेमींची संख्या कमी नाही. संपूर्ण जगभरात मोठया प्रमाणात पाळीव प्राणी पाळले जातात. आजकाल तर प्रत्येक घरात एक पाळीव प्राणी पाहायला मिळतो, असे म्हणण्यास हरकत नाही. हल्ली हेच पाळीव प्राणी आपल्या मालकाला करोडो रूपये कमवून देण्यास सक्षम ठरतात. असेच काही पाळीव प्राणी म्हणजेच (कुत्री, मांजरी) यांनी आपल्या नावाने मालकांना सोशलमिडीयाच्या माध्यमातून करोडो रूपये कमवून दिले. अशा या पाळीव प्राण्यांविषयी जाणून घेऊयात.

गुंथर (Gunther)

गुंतर नावाचा जर्मन शेफर्ड कुत्रा हा जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी आहे. कारण गुंतर याने आपल्या मालकाला 4 हजार 132 कोटी रूपयांची संपत्ती मिळवून दिली. ही संपत्ती त्यांनी सोशलमिडीयाव्दारे कमविली आहे. जसे की, व्हिडीओ, पोस्ट, जाहिरात 

नाला मांजर (Nala Cat)

जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांमध्ये दुसरा नंबर पटकविला नाला मांजरीने (Nala). AllAboutCats.com या वेबसाईटनुसार, नाला जगातील सर्वात श्रीमंत मांजर असून, तिचा पाळीव प्राण्यांमध्ये दुसरा क्रमांक लागतो. नाला सोशल मीडियावरील जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमविते. नाला ही सियामी पर्शियन मिक्स जातीची मांजर आहे. नाला या मांजरीची संपत्ती सुमारे 826 कोटींची आहे. एवढेच नाही तर या मांजरीचे 4.4 दशलक्ष फॉलोअर्स असून ही इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी मांजर आहे. नाला या मांजरीचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आले आहे.

ऑलिव्हिया बेन्सन (Olivia Benson) 

अमेरिकेची प्रसिध्द गायिक टेलर स्विफ्ट (Taylor Swift) ची पाळीव मांजर ऑलिव्हिया ही एक स्कॉटिश फोल्ड फेलाइन जातीची मांजर आहे. या मांजरीने काही म्युझिक व्हिडीओ व जाहिरांतीमधून ही काम केले आहे. ही मांजर जगभरातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्टची मांजर ऑलिव्हिया 97 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 800 कोटीची मालकीण आहे.