Amazon prime day sale Offers : Amazon चा प्राइम डे सेल 15 जुलैपासून सुरू होत आहे. या दोन दिवसीय सेलमध्ये ग्राहकांना भरघोस सवलतींचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर बँक ऑफर्समध्येही सूट मिळू शकते. सेलचा एक भाग म्हणून, Amazon हळूहळू ऑफरसह उपलब्ध करून दिले जाणारे प्रॉडक्ट ओपन करत आहे. कंपनीने Amazon पेजवर लाइव्ह झालेल्या ऑफरबद्दल सांगितले आहे. सेलमध्ये कोणते फोन स्वस्तात खरेदी केले जाऊ शकतात याची माहिती ऑफरच्या लिस्टमधून समोर आली आहे. सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोनवर सूट मिळणार आहे जाणून घेऊया.
Amazon प्राइम डे सेल बजेट फोन्सच्या सर्वोत्तम स्मार्टफोन डील ज्यामध्ये सूट मिळेल त्यामध्ये Samsung Galaxy M14, IQOO Z6 Lite, Realme Narzo N53, Redmi 12C आणि Tecno Spark 9 यांचा समावेश आहे. हे फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या प्राइम डे सेल पेजवर लिस्टेड आहेत आणि सध्या त्यांची किंमत 15,000 च्या खाली आहे.
Table of contents [Show]
Realme Narzo N53
Amazon वर कमी किमतीत उपलब्ध करून दिला जाईल. याची खरी किंमत अजून माहित झालेली नाही. 10999 रुपये ही किमत कट करून याची नवीन किंमत हाइड करण्यात आली आहे.
OnePlus Nord CE 3 Lite 5G
सेल पेजवर 19,999 रुपये कट करून या फोनची नवीन किंमत हाइड करण्यातआली आहे. याचा अर्थ ग्राहक ते कमी किमतीमध्ये खरेदी करू शकणार आहे. यात 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग मिळते. तसेच यामध्ये 108-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
iPhone 14
जर तुम्ही आयफोनचे फॅन असाल, तर न्यू मॉडेल स्वस्तात खरेदी करण्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल. ऑफर पेजवर आयफोनची 79,900 ही किमत कट करून नवीन किंमत हाइड करण्यात आली आहे. यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. यात 20 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक मिळतो.
Redmi A2
जर तुम्ही बजेट फोन घेण्याचा विचार करत असाल, तर Redmi चा स्वस्त फोन आणखी स्वस्त दरात उपलब्ध होईल. हा फोन Amazon वरून 8,999 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून दिला जाईल.
Samsung Galaxy M14 5G
हा फोन Amazon प्राइम डे सेलमध्ये देखील लिस्ट झाला आहे. ऑफर पेजवर त्याची किंमत 17,900 रुपये करण्यात आली आहे आणि एक हाइड केलेली नवीन किंमत लिहिली आहे. फोन 6000mAh बॅटरीसह येतो. यात 5nm ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.
Source : hindi.news18.com