Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Card वापर होणार आणखी महाग, HDFC Bank ने फी स्ट्रक्चरमध्ये केलेले विविध बदल घ्या जाणून...

Credit Card

Image Source : www.hdfcbank.com

एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड आता महाग होणार आहे. बँकेकडून आपल्या वेगवेगळ्या क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट सिस्टिममध्ये बदल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी कर्जावरील व्याजदरात वाढ केली होती. आता बँकेच्या काही सेवांमध्येही बदल होणार आहे. यामुळे एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांच्या खिशावरचा भार आता आणखी वाढणार आहे.

एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड आता महाग होणार आहे. बँकेकडून आपल्या वेगवेगळ्या क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट सिस्टिममध्ये  बदल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी कर्जावरील व्याजदरात वाढ केली होती. आता बँकेच्या काही सेवांमध्येही बदल होणार आहे. यामुळे एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांच्या खिशावरचा भार आता आणखी वाढणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून हे बदल होणार आहेत. बँकेने एसएमएस आणि ईमेलद्वारे आपल्या ग्राहकांना याविषयी माहिती दिली आहे. 

1 टक्के कन्वर्जन फी ही द्यावी लागणार 

या व्यतिरिक्त बँकेकडून इंटरनॅशनल व्यवहारांवरील चार्जमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही इंटरनॅशनल लोकेशनवर भारतीय रुपयांमध्ये transaction केलेत तर तुम्हाला 1 टक्के कन्वर्जन फी द्यावी लागेल. 


रिवॉर्ड  पॉईंट सिस्टिममध्येही बदल (Changes in Reward Point System)

HDFC बँकेकडून आपल्या वेगवेगळ्या क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट सिस्टिममध्ये देखील बदल करण्यात आला आहे. कार्ड होल्डर HDFC च्या रिवॉर्ड पॉइंट पोर्टल SmartBuy वर  दर महिन्याला 1.5 लाख पॉइंटपर्यंत रिडीम करू शकतो. हेच Diners Black कार्डधारक 75,000 पॉइंट पर्यंत दर महिन्याला र‍िडीम करू शकतो. याचप्रमाणे  Tanishq  च्या व्हाऊचरवर  वाउचर Infinia कार्ड धारक दर महिन्याला  जास्तीत जास्त 50,000 पॉइंट  रिडीम करू शकतो.. Millennia, Pharmeasy, Bharat आणि  Paytm कार्डवर  दर महिन्याला 3000 पॉइंट  र‍िडीम केले जाऊ शकते. हे बदल 1 फेब्रुवारीपासून लागू होतील.

एचडीएफसी बँकेने थर्ड पार्टी मर्चंटच्या माध्यमातून रेंट चे पैसे देण्यावर लागणाऱ्या फी स्ट्रक्चरमध्ये बदल केला आहे.बँकेच्या वेबसाईटनुसार, पैसे भरताना केलेल्या व्यवहारांवरील एकूण रकमेवर 1 टक्के फी म्हणून आकारली जाईल. ही फी दुसऱ्या महिन्याच्या रेंटल व्यवहारांपासून घेतली जाणार आहे.

रिवॉर्ड पॉइंटसह, कन्वर्जन फी असे फ्री स्ट्रक्चरमध्ये एचडीएफसी बँकेने काही बदल झाले आहेत. क्रेडिट कार्ड वापरणेही आता आणखी महाग होणार आहे. एचडीएफसी बँकेचे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आहेत. त्यांना यातील काही बाबतीत जानेवारी तर काही सेवांच्या बाबतीत फेब्रुवारीपासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.