Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jio 5G Plan: जाणून घ्या, आतापर्यंतचा जिओचा सर्वात स्वस्त Jio 5G रिचार्ज प्लॅन

Jio 5G Plan

Jio 5G : एकीकडे मोबाईल रिचार्ज किंमती वाढत असताना, जिओने मात्र खास ग्राहकांसाठी जिओ 5 जी प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. हा जिओचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या 'Jio 5 G' प्लॅनविषयी अधिक जाणुन घेऊयात.

Jio 5G Plan: Jio 5 G लाँच झाल्यापासून ग्राहक 5G प्लॅनची प्रतिक्षा करीत होते. या प्लॅनच्या किंमती काय असणार असे प्रश्नदेखील ग्राहकांच्या डोक्यात फिरत होते. मात्र ग्राहकांना एक आनंदाचा धक्का देत, जिओने खास आपल्या ग्राहकांसाठी Jio 5G चा प्लॅन अगदी स्वस्तात उपलब्ध करून दिला आहे. या प्लॅनविषयी अधिक माहिती जाणून घेवुयात.

जिओ 5 जी ची किंमत (Jio 5G Price)

जिओने आपल्या ग्राहकांसाठी Jio 5G चा प्लॅन अगदी स्वस्तात उपलब्ध करून दिला आहे. यांची किंमत आहे फक्त 61 रूपये आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला 5G चा डेटा मिळतो. जिओ कंपनीने हा प्लॅन अशा यूजर्ससाठी लाँच केला आहे की, ज्यांना 5G वर अपग्रेड करायचे आहेत. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये इतर फायदे मिळणार नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, Jio ने 5G अपग्रेड नावाने हा रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिला आहे.

ऑफर जाणून घ्या (Check out the Offer)

जिओच्या या स्वस्त प्लॅनमध्ये यूजर्सना 5G डेटा मिळतो. या रिचार्जची किंमत 61 रुपये आहे. जिओचा हा प्लॅन डेटा व्हाउचर असून, यामध्ये तुम्हाला इतर कोणताही फायदा मिळणार नाही. थोडक्यात या रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा नसणार आहे. यामध्ये यूजर्सना 6GB 5G डेटा मिळणार आहे. तसेच, प्लॅनची कोणतीही वैधता नाही.

5G अपग्रेडबाबत जाणून घ्या (Learn about 5G Upgrades)

5G अपग्रेड केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क सुरू होईल. यासाठी तुमचा मोबाईल 5G असला पाहिजे आणि तुम्ही Jio 5G उपलब्ध असलेल्या भागात राहत असला पाहिजे तरच तुमच्या मोबाईलला 5G नेटवर्क कनेक्ट होईल . Jio ची 5G सेवा अद्याप सर्वांसाठी सूरु केलेली नाही, तर ती फक्त निवडक युजर्ससाठी उपलब्ध आहे. जिओ कंपनीची 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे Jio वेलकम ऑफर असणे गरजेचे आहे. या ऑफरव्दारे, कंपनी अमर्यादित 5G डेटामध्ये एन्ट्री देते. ही एन्ट्री आधारित ऑफर आहे. माय जिओ अॅपवर जाऊन तुम्ही यासाठी रजिस्ट्रर करू शकता.