Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC App Registration: ऐनवेळी तिकीट बुकिंग करताना गडबड नको; IRCTC ॲपवर असे करा अकाउंट ओपन

IRCTC App Registration Process

IRCTC App Registration Process: तुम्ही देखील वारंवार प्रवास करत असाल, तर रेल्वेच्या IRCTC ॲपचा वापर नक्की करा. तिकीट बुकिंगपासून ते हॉटेल्स बुकिंगपर्यंत वेगवेगळ्या सुविधा याठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. या सुविधांचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला तेथे अकाउंट ओपन करणे गरजेचे आहे. ते नेमके कसे करायचे. हे आपण जाणून घेणार आहोत.

सुरक्षित आणि रास्त तिकीट दरात चांगला प्रवास करण्यासाठी भारतातील बहुसंख्य लोक रेल्वेची निवड करतात. रेल्वेचे जाळे भारतातील कानाकोपऱ्यात विस्तारल्याने कोणत्याही शहरात रेल्वेने सहज प्रवास करता येतो. भारतीय रेल्वेने प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी 2018 मध्ये IRCTC ॲप लॉन्च केले. या ॲपच्या माध्यमातून किंवा IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवरून प्रवाशांना तिकीट बुकिंग, ट्रेनचा रूट, रेल्वे टाईमटेबल, स्टेशन्स अशी सर्व माहिती उपलब्ध करून दिली. IRCTC ॲपमधून ही अनेकजण तिकीट बुकिंग करतात. पण हे तिकीट बुकिंग करण्यापूर्वी युझरला त्यावर नोंदणी (Registration) करणे गरजेचे असते. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय युझरला तिकीट बुकिंग करता येत नाही. तेव्हा नोंदणी पूर्ण करून अकाउंट कसे तयार करायचे, हे आपण समजून घेणार आहोत.

IRCTC ॲपवर मिळतात 'या' सुविधा

या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट बुक करण्याची आणि रद्द करण्याची सुविधा पुरवली जाते. याशिवाय ट्रेनची वेळ, त्याचे भाडे आणि ट्रेनचे लाईव्ह ट्रॅकिंगही करता येते. तसेच प्लॅटफॉर्मवरील ट्रेनच्या डब्यांची अरेंजमेंट कशी असेल, याबाबतही ॲपवर वापरकर्त्याला माहिती देण्यात येते. जर प्रवाशाने बुक केलेले तिकीट रद्द केले, तर त्याचा रिफंड मिळवून देण्यासाठीही या ॲपची मदत होते.

याशिवाय IRCTC ॲपवर वापरकर्त्यांना हॉटेल बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच रेल्वेशिवाय विमानाचे आणि बसचे तिकीटदेखील प्रवासी येथून बुक करू शकतात. वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टसाठी प्रवासी या एकाच ॲपचा वापर करू शकतात.

IRCTC Registration App

IRCTCचे अकाउंट असे ओपन करा

तुम्ही तिकीट बुकिंगसाठी IRCTC वेबसाईट आणि ॲप दोन्हीचा वापर करू शकता. ॲण्ड्रॉईड, विन्डोज आणि आयफोन अशा सर्व प्लॅटफॉर्मवर याची सुविधा उपलब्ध आहे. फक्त त्यासाठी त्यांना त्या वेबसाईटवर/ॲपवर अकाउंट ओपन करावे लागते. अकाउंट ओपन करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ती कशी करायची, ते जाणून घेऊयात.

सर्वप्रथम मोबाईलमध्ये Google Play Store मधून 'IRCTC Rail Connect App' डाऊनलोड करा. डाऊनलोड झालेले ॲप ओपन करून Log In वर क्लिक करा.

लॉगिनसाठी युझरनेम, संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, लिंग आणि जन्मदिनांक ही माहिती देऊन पासवर्ड सेट करा. त्यानंतर Next या पर्यायावर क्लिक करा.

इथे तुम्हाला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, पासवर्ड विसरल्यानंतर नवीन पासवर्ड सेट करण्याचा पर्याय विचारला जाईल. तो दिल्यावर तुमची वैवाहिक स्थिती आणि पत्ता द्या आणि Next या पर्यायावर क्लिक करा.

तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आणि ईमेल आयडीवर आयआरसीटीसीकडून OTP येईल. तो व्हेरिफाय केला की झाले तुमचे अकाउंट तयार. 

अशाप्रकारे तुम्ही IRCTC ॲपवर अकाउंट बनवून ठेवले असेल, तर ऐनवेळी तिकीट बुक करताना गडबड होत नाही आणि तुम्ही वेळेत तिकीट बुक करू शकता.

Source: abplive.com