iQOO Neo 7: चीनमध्ये काही महिन्यांपूर्वीच लॉन्च झालेला iQoo Neo 7 भारतातही लॉंच होणार आहे. iQoo Neo 7 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले आहे. iQoo Neo 7 तीन प्रकारांमध्ये आहे आणि 12 GB पर्यंत RAM सह 512 GB पर्यंत स्टोरेज आहे. iQoo Neo 7 भारतात 16 फेब्रुवारी रोजी लॉन्च केला जाणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार, तो फक्त Amazon India वरून विकला जाणार आहे.
किती असू शकते iQOO Neo 7 ची किंमत? (How much can iQOO Neo 7 cost?)
iQoo ने अजूनही iQoo Neo 7 च्या वैशिष्ट्यांबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु फोनच्या चीन मधील सिरिजवरून याच्या फीचर्सचा अंदाज लावला जाऊ शकतो. iQoo Neo 7 चीनमध्ये 2,699 चीनी युआन म्हणजेच सुमारे 30800 रुपये किंमतीला लॉन्च करण्यात आला आहे. ही किंमत 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची आहे. चीनमध्ये iQoo Neo 7 हे जिओमेट्री ब्लॅक, इंप्रेशन ब्लू आणि पॉप ऑरेंज कलरमध्ये (Geometry Black, Impression Blue and Pop Orange colors) लॉंच करण्यात आले आहे.
iQoo Neo 7 ची वैशिष्ट्ये (Features of iQoo Neo 7)
iQoo Neo 7 मध्ये 6.78-इंच फुल एचडी प्लस Samsung E5 AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. फोनमध्ये 4nm MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसर आहे आणि 12 GB पर्यंत LPDDR5 RAM सह ग्राफिक्ससाठी Mali-G710 GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये Android 13 आधारित OriginOS Ocean आहे.
यासोबतच फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे ज्यासोबत 120W फ्लॅश चार्जिंग (Flash charging) देखील आहे. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास, iQoo Neo 7 मध्ये तीन रियर कॅमेरे (Rear cameras) आहेत, ज्यामध्ये फ्रंट लेन्स 50-मेगापिक्सलचा Sony IMX766V सेन्सर आहे, ज्यामध्ये अपर्चर f/1.88 आहे आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS ला देखील समर्थन देते. मागील एक लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड आहे आणि दुसरा 2 मेगापिक्सेल मॅक्रो आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.