भारतीय चलन म्हणजे रुपये 2000 (2000 rupee note), रुपये 500 च्या नोटा अगदी छपाईच्या कागदासारख्या दिसतात. पण बाजारात त्यांची किंमत खूप जास्त आहे. तसे, या नोट एका विशिष्ट पद्धतीने बनवण्यात आल्या आहेत, ज्या केवळ कागदासारख्या नसतात. नोटमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये असतात, ज्यामुळे त्यांची एक खास ओळख असते. याच्या मदतीने तुम्ही बनावट आणि खऱ्या नोटा ओळखू शकता. पण, 2000, 500 किंवा 200 रुपयांची नोट छापण्यासाठी किती खर्च येतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जरी यात अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये असली परंतु तरीही त्याची छपाईची किंमत फार जास्त नाही. या नोटेच्या मूल्यानुसार ही किंमत खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला एक नोट छापण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI – Reserve Bank of India) किती खर्च येतो? हे सांगणार आहोत.
नोटा कुठे छापल्या जातात?
नोटांच्या छपाईवर होणाऱ्या खर्चाविषयी जाणून घेण्यापूर्वी या नोटा कोण छापतात? आणि कुठे छापल्या जातात? ते पाहूया. भारतीय चलनी नोटा भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक छापतात. ते फक्त सरकारी छापखान्यात छापले जाते. देशभरात चार छापखाने आहेत. नाशिक, देवास, म्हैसूर आणि सालबोनी (पश्चिम बंगाल) येथे नोटांची छपाई केली जाते. ते छापण्यासाठी विशेष प्रकारची शाई वापरली जाते. ही शाई स्वित्झर्लंडची एका कंपनीद्वारे बनवण्यात येते. त्याचा कागदही खास पद्धतीने तयार केला जातो.
2000 रुपयांची नोट छापण्यासाठी किती खर्च येतो?
2000 रुपयांच्या नोटांच्या छपाईमुळे 2018-19 मध्ये खूप कमी खर्च झाला. याच्या एक वर्षापूर्वी 2017-18 मध्ये हा खर्च जास्त होता आणि आता तो खूपच कमी झाला आहे. जर आपण एका नोटेनुसार बोललो तर नोटांच्या छपाईचा खर्च 18.4 पैशांनी कमी झाला आहे, म्हणजेच 2019 मध्ये नोटांच्या छपाईवर 65 पैसे कमी खर्च झाला आहे. 2018 मध्ये 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी 4 रुपये 18 पैसे खर्च झाले होते, तर 2019 मध्ये नोट छापण्यासाठी 3.53 पैसे खर्च करण्यात आले होते. म्हणजेच 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी केवळ 3-4 रुपये खर्च येतो.
इतर नोटांचे काय?
जर आपण इतर नोटांबद्दल बोललो तर 500 रुपयांची नोट छापण्यासाठी 2 रुपये13 पैसे मोजावे लागतात. त्याच वेळी, 200 रुपयांची नोट छापण्यासाठी 2 रुपये 15 पैसे मोजावे लागतात. तसे, प्रिंटिंग प्रेसमुळे अनेकदा किंमतीत थोडासा बदल देखील होतो. 2018 च्या आकडेवारीनुसार, 10 रुपयांची नोट छापण्यासाठी 1.01 रुपये, 20 रुपयांची नोट छापण्यासाठी 1 रुपये, 50 रुपयांची नोट छापण्यासाठी 1.01 रुपये आणि 100 रुपयांची नोट छापण्यासाठी 1.51 रुपये मोजावे लागतात.