• 28 Nov, 2022 18:19

Where are the Rs 2,000 notes gone : कुठे गेली 2 हजार रूपयांची नोट? रिझर्व्ह बँकेने दिले 'हे' उत्तर

RBI, Rs.2000 Currency Note

Where are the Rs 2,000 notes gone : भारतात 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. 1000 रुपयांच्या ऐवजी 2000 रुपयांची गुलाबी नोट चलनात आली. पण आता हीच गुलाबी नोट कुठेही दिसत नाही आहे. अचानक चलनातून दोन हजारांची नोट दुर्मिळ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

भारतात 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. 1000 रुपयांच्या ऐवजी 2000 रुपयांची गुलाबी नोट चलनात आली. पण आता हीच गुलाबी नोट कुठेही दिसत नाही आहे. अचानक चलनातून दोन हजारांची नोट दुर्मिळ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.  

नोटबंदीनंतर चलनात आली 2000 रुपयांची नोट 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi, PM) यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनातील सर्व जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बाद झाल्याची घोषणा केली. त्यावेळी आरबीआयने या नोटांऐवजी 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या.

काय म्हणतो रिझर्व्ह बँकेचा अहवाल?(Reserve Bank's Annual Report Say?)

काही दिवसांपूर्वीच नोटबंदीच्या (Demonetisation) निर्णयाला 6 वर्ष पूर्ण झाली. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बाद झाल्यामुळे त्यावेळी अर्थव्यवस्थेतून बाद होणाऱ्या चलनाची भरपाई करण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची गुलाबी नोट चलनात आणली. नुकताच रिझर्व्ह बँकेने वार्षिक अहवाल सादर केला. या अहवालात असे म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2019-20, आर्थिक वर्ष 2020-21, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात न आल्याने बाजारातील 2000 रुपयांच्या नोटांचे चलन कमी झाले आहे.

2000 रुपयांच्या नोटा बंद झाल्या का? (Rs.2000 Notes been Discontinued?)

2000 रुपयांची नोट दिसत नसल्याने त्या बंद झाल्या का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तर याचे उत्तर नाही आहे. नोटांची छपाई होत नसल्याने लोकांच्या हातात या नोटा कमी दिसत आहेत. रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, 31 मार्च 2017 पर्यंत चलनात असलेल्या नोटांच्या एकूण मूल्यामध्ये 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 52.2 % होता. तर 31 मार्च 2022 रोजी हाच वाटा 13.8% झाला. आरबीआयशी चर्चा करूनच सरकार नोटांची छपाई करत असतं. एप्रिल 2019 पासून रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. त्यामुळेच लोकांच्या हातात  2000 रुपयांची नोट कमी प्रमाणात दिसत आहे.