Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: जाणून घ्या, अर्थसंकल्पानंतर पुणे शहराच्या रेल्वे विभागाला किती मिळाला निधी?

How much Funding did the Railway Department of Pune City Get

Image Source : http://www.nationalheraldindia.com/

Pune City Railway Division News: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात विविध भागांसाठी किती निधी खर्च करण्यात येणार आहे याची घोषणा केली. यामध्ये रेल्वे विभागाला 2.40 लाख रूपये कोटी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र यातून पुणे शहराच्या रेल्वे विभागाला किती निधी मिळाला हे जाणून घेवुयात.

How much Funding did the Railway Department of Pune City Get: साधारण 2 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांच्याकडून अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. यानंतर लगेच रेल्वे मंत्रालयाकडून ‘पिंक बुक’ (Pink Book) जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये पुणे विभागाला किती निधी मिळाला आहे तसेच कशासाठी किती खर्च करण्यात येणार आहे. याची मांडणी करण्यात आली आहे.

पुणे रेल्वे विभागासाठी किती खर्च?(How much Cost for Pune Railway Division)

 पिंक बुकमध्ये सांगण्यात आले की, अर्थसंकल्पात रेल्वे विभागाला मिळालेल्या एकूण रकमेपैकी महाराष्ट्र राज्याच्या रेल्वे विभागासाठी 13 हजार 539 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यापैकी पुणे शहराच्या वाटयाला 1300 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे.

पुणे रेल्वे विभागातर्फे कसा असेल खर्च? (How will the Expenditure be by Pune Railway Department)

वंदे भारत ही ट्रेन 2024 पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. या वंदे भारत ट्रेनसाठी पुण्यामध्ये नवीन पिट लाइन टाकण्यात येणार असून यासाठी 50 कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पुणे विभागात डिझेल शेड, महत्वपूर्ण असलेल्या  18 रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन अंतर्गत विकासासाठी मोठी तरतूद केली आहे. एवढेच नाही, तर बारामती ते लोणंद हा 54 किलोमीटर आणि फलटण-पंढरपूर हा 105 किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला असून, मोठा निधी देण्यात येणार आहे. सोबतच पुणे विभागातील काही मार्गावर ओव्हर ब्रिज उभारण्याचीदेखील नियोजन केले आहे. त्यामुळे यासाठीदेखील एक ठराविक रक्कम देण्यात आली आहे.

पुणे विभागातील कामे व त्यावर किती खर्च? (Works in Pune Division and How much Cost)

पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रीमॉडेलिंग 25 कोटी, हडपसर टर्मिनलचा विकास 2 कोटी, घोरपडीत वंदे भारत एक्सप्रेसची पिट लाइन 50 कोटी, बारामती-लोणंद नवा रेल्वेमार्ग 100 कोटी, फलटण-पंढरपूर रेल्वेमार्ग 20 कोटी, पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे 900 कोटी, हातकणंगले-इचलकरंजी नवा रेल्वेमार्ग 2 कोटी, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग 1000 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील नवीन रेल्वे मार्गिक मार्गसाठीदेखील कोटयावधी खर्च करण्यात येणार आहे.