Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: जाणून घ्या, रेल्वेकडून महाराष्ट्रासाठी किती निधी देण्यात आला?

How much Funds for Maharashtra from Railways in the Budget

Image Source : http://economictimes.indiatimes.com/

How much Funding for Maharashtra from Railways: अर्थमत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी निधी रेल्वे विभागाला देण्यात आला आहे. परंतु यातून महाराष्ट्र रेल्वे विभागाला किती निधी देण्यात आला आहे, याची चर्चा मात्र सर्वत्र आहे.

How much Funds for Maharashtra from Railways in the Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी एक मोठी तरतूद करण्यात आली आहे. साधारण 2.40 लाख कोटी शासनाकडून रेल्वेसाठी देण्यात आले आहे. मात्र यातून महाराष्ट्र राज्याच्या वाटयाला किती आले आहे, हे थोडक्यात जाणून घेवुयात.

अर्थसंकल्पातून महाराष्ट्र रेल्वे विभागाला किती निधी?(How much Funds to Maharashtra Railway Department)

देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वीच अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये रेल्वे विभागाला 2.40 लाख कोटी देण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. या घोषणेनंतर चर्चा सुरू झाली की, भले महाराष्ट्राच्या वाटयाला नक्की किती रक्कम आली?  या प्रश्नाची दखल घेत रेल्वेमंत्री अश्र्विनी वैष्णव यांनी एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले की, यंदा 2023-24 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याला 13 हजार 539 कोटी रूपये निधी देण्यात आला आहे. 2009 ते 2024 च्या अर्थसंकल्पपेक्षा हा निधी सर्वाधिक आहे. जर तुलना केली, तर सरासरी 1 हजार 171 कोटी रुपये वाटपाच्या जवळपास 11 पट  ही रक्कम असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नवीन रेल्वे मार्गासाठी 1 हजार 685 कोटींचा निधी (1 thousand 685 Crore Fund for New Railway Line)

महाराष्ट्र रेल्वेकडून काही नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ 201 कोटी, वर्धा-नांदेड मार्गे यवतमाळ पुसदसाठी 600 कोटी, सोलापूर-उस्मानाबाद मार्गे तुळजापूर 110 कोटी, धुळे-नरडाणा 100 कोटी, कल्याण-मुरबाड मार्गे उल्हासनगर 100 कोटी, बारामती-लोणंद  100 कोटी,  फलटण-पंढरपूर  20 कोटी रूपये या नवीन रेल्वे मार्गांवर खर्च करण्यात येणार आहे.

रस्ता सुरक्षा कामांसाठी एकूण 695 कोटी (695 Crores in Total for Road Safety Works)

रेल्वेकडून रस्ता सुरक्षा संदर्भातदेखील कामे करण्यात येणार आहे. यासाठी जवळजवळ एकूण 695 कोटी रूपये इतका खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये विक्रोळी आरओबी 4 कोटी, दिवा आरओबी  5 कोटी,  बडनेरा वॅगन दुरुस्ती कार्यशाळा 40  कोटी, रत्नागिरी रोलिंग स्टॉक घटक कारखाना 82  कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. 

ग्राहक सुविधांसाठी 776 कोटी रूपये (776 crore for Consumer Facilities)

 रेल्वेकडून ग्राहकांच्या सुविधांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. यामध्ये ट्रॅक नूतनीकरण 1400 कोटी, पुलाचे काम, बोगद्याचे काम 113 कोटी, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनची कामांसाठी 237 कोटी रूपये इतका खर्च करण्यात येणार आहे. तसेच गेज रूपांतरण, दुहेरीकरण / 3 री लाइन / 4 थी लाइन वाहतूक सुविधा व इतर अनेक कामांसाठीदेखील कोटी रूपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.