Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Investment: म्युच्युअल फंडमधील SIP गुंतवणुकीतून किती वर्षात करोडपती व्हाल, जाणून घ्या

HOW TO BECOME MILLIONARE

SIP Investment: करोडपती किंवा लखपती व्हायचे असेल तर लॉटरी लागली पाहिजे, असा सर्वसामान्यांचा समज असतो. अनेकजण या आशेपोटी नियमितपणे लॉटरीसुद्धा काढत असतात. या लॉटरीमुळे ते लखपती होतात की नाही, माहित नाही. पण म्युच्युअल फंडमधील नियमित गुंतवणुकीतून नक्कीच लखपती होऊ शकतो.

SIP Investment: करोडपती किंवा लखपती व्हायचे असेल तर लॉटरी लागली पाहिजे, असा सर्वसामान्यांचा समज असतो. अनेकजण या आशेपोटी नियमितपणे लॉटरीसुद्धा काढत असतात. या लॉटरीमुळे ते लखपती होतात की नाही, माहित नाही. पण म्युच्युअल फंडमधील नियमित गुंतवणुकीतून नक्कीच लखपती होऊ शकतो.

म्युच्युअल फंडमधील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP च्या मदतीने तुम्ही जितक्या कालावधीसाठी गुंतवणूक कराल तेवढा तुम्हाला त्यातून फायदा मिळेल. या गुंतवणुकीतून चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते. तसेच मार्केटमधील अभ्यासानुसार इक्विटी म्युच्युअल फंडमधून वर्षाला किमान 12 टक्क्यापर्यंत परतावा मिळतो. सध्या एवढा परतावा कोणतीही योजना देत नाही. पण म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही शेअर मार्केटशी संबंधित असल्याने त्यातून तेवढाच परतावा मिळेल, याची खात्री कोणीही देत नाही.

सप्टेंबरमध्ये SIP गुंतवणूकदारांमध्ये लक्षणीय वाढ

म्युच्युअल फंडमध्ये एकत्रित किंवा एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते. म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीला सर्वसामान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सप्टेंबर महिन्यातील एसआयपीमधील गुंतवणूक पाहिली तर ती16,420 कोटींवर पोहोचली आहे. त्याच्या अगोदरच्या महिन्यात ऑगस्टमध्ये ती 15,814 कोटी रुपये होती. म्हणजेच दिवसेंदिवस एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही गुंतवणूक शेअर मार्केटशी संबंधित असली तरी याकडे वाढलेला ओढा लक्षणीय आहे.

आज आपण महिन्याला किती रुपयांची एसआयपी केली की, किती वर्षात करोडपती होऊ शकतो, हे समजून घेणार आहोत. यासाठी आपण प्रत्येक महिन्याला 5000, 8000 आणि 10000 रुपयांची एसआयपीचे उदाहरण पाहुया.

SIP CALCULATOR

मासिक गुंतवणूक
अपेक्षित परतावा दर
%
कालावधी
Yr
गुंतवणूक केलेली रक्कम
अंदाजे परतावा
एकूण मूल्य

प्रत्येक महिन्याला 5 हजारांची एसआयपी

जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपयांची एसआयपी सुरू केली. या एसआयपीवर तुम्हाला वर्षाला 12 टक्के परतावा मिळत आहे, असे गृहित धरूया. तर तुम्हाला सलग 26 वर्षे प्रत्येक महिन्याला 5 हजारांची एसआयपी करावी लागेल. तेव्हा तुम्ही करोडपती होऊ शकता. 26 वर्षात 5 हजारांच्या हिशोबाने तुमची एकूण गुंतवणूक 15 लाख 60 हजार रुपये होते. त्यावर 12 टक्के व्याज पकडले तर तुम्हाला 26 वर्षांनी 1 कोटी 7 लाख 55 हजार रुपये मिळतील. म्हणजे 5 हजारांच्या एसआयपीने तुम्ही 26 वर्षांत करोडपती होऊ शकता.

8 हजारांची एसआयपी

प्रत्येक महिन्याला 8 हजारांची एसआयपी केली, तर तुम्ही 22 वर्षांनी करोडपती होऊ शकता. एसआयपीच्या माध्यमातून 22 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 21 लाख 12 हजार रुपये होईल. त्यावर 12 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजानुसार 22 वर्षांनी 1 कोटी 3 लाख 67 हजार रुपये मिळतील.

10,000 रुपयांची एसआयपी

दहा हजारांच्या मासिक एसआयपीने तु्म्ही 20 वर्षांत करोडपती होऊ शकता. 20 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 24 लाख रुपये होईल. त्यावर मिळणाऱ्या परताव्यातून तुमच्या 24 लाखाचे मूल्य 20 वर्षात 1 कोटी रुपये होईल. म्हणजेच 10 हजारांच्या एसआयपीने तुम्ही 20 वर्षांत करोडपती होऊ शकता.

मार्केटमधील विविध गुंतवणूक योजनांपैकी एसआयपीची ही खासियत आहे की, दीर्घकाळातील गुंतवणुकीतून यातून चांगला परतावा मिळतो. तसेच यामध्ये किमान रकमेपासून गुंतवणूक सुरू करता येते. त्यामुळे तुम्हालाही लखपती किंवा करोडपती व्हायचे असेल सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनची मदत घेऊ शकता.

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)